News 34 chandrapur
चंद्रपूर :- जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील आवाळपूर येथील दिपाली रविचंद्र मासीरकर ही २००८ च्या नागालँड बॅचची आयपीएस अधिकारी आहे.
Central Election Commission
Central Election Commission
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणूकीकरिता संचालक म्हणून दिल्ली येथे त्यांची नेमणूक केली असून त्या निवडणुकीचे निरीक्षण करणार आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याची मान उंचावली आहे. आज देशात राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. President election india
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून एनडीएकडून द्रोपदि मुर्मू तर यूपीए कडून यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यासाठी आज मतदान होणार आहे. सद्या केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पाच वर्षासाठी भारत निवडणूक आयोगात संचालक म्हणून दिपाली मासिरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Ips dipali masirkar मराठमोळ्या महिला आयपीएस (ips) अधिकाऱ्याला राष्ट्रपती निवडणुकीत आपले कर्तव्य बजावण्याची संधी मिळालेली आहे. ही बाब अभिमानास्पद आहे. मुंबई येथे सहाय्यक महानिरीक्षक या पदावर त्यांनी कार्य केले. नागपूर येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी सुद्धा त्यांनी काम केले असून भारत निर्वाचन आयोगाच्या संचालक पदी नियुक्ती पूर्वी नागालँडमधील कोहीना येथे पोलीस उप महानिरीक्षक म्हणून त्या कार्यरत होत्या.
भारत निवडणूक आयोगाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आता त्या महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आता त्या महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.