News 34 chandrapur
राजुरा - पावसाचा जोर पाणी आणि पूर हे दृश्य बघण्यासाठी नागरिक एकच गर्दी करतात, काही तर पुराच्या पाण्यात पोहायला जातात मात्र पोहण्याचा मोह हा कधी जीवावर ही बेतू शकतो, अश्या अनेक घटना सध्या उघडकीस आल्या आहे मात्र पोहण्याचे शौकीन आपला मोह आवरत नसून ते स्वतःच्या जीवानिशी खेळण्याचा प्रयत्न करीत आहे.असाच पुराच्या पाण्यात पोहण्याचा मोह युवकाच्या जीवावर बेतला.flood area
चंद्रपूर जिल्ह्यात आठवडाभर मुसळधार पाऊस आल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत होते.
शनिवारी दुपारी चार वाजता च्या सुमारास गोवरी कॉलनी येथील एका युवकाची दुचाकी क्रमांक एम.एच.34 बि.के. 8442 आणि कपडे गोवरी जवळील नाल्याजवळ आढळून आले. swimming
प्रीतम गुरुदास आवारी वय 24 वर्ष रा. गोवरी कॉलनी असे त्या युवकाचे नाव असून हा युवक पोहायला आला होता. याबाबतची माहिती राजुरा पोलिसांना मिळताच घटनास्थळी एपीआय साखरे व अन्य पोलिस कर्मचारी दाखल झाले. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला मात्र गोवरी नाल्यात तुडुंब पाणी असल्यामुळे त्याचा शोध लावण्यात अडथळा निर्माण होत होता. आज दि.17 जुलै ला पहाटे नाल्यातून पूर ओसरल्यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला. मृतकाच्या मागे आई-वडील व तीन बहिणी असून प्रीतम आवारी यांचे वडील वेकोलि बल्लारपूर क्षेत्रात चालक म्हणून कार्यरत आहेत. Stunt in flood water
प्रीतम ची आई नुकतीच तीर्थयात्रेला गेली असल्याने हा तरुण आपल्या लहान बहिणी आणि वडिलांसोबत घरी होता. पण दि. 16 जुलै रोजी दुपारी पावणेचार वाजता च्या सुमारास प्रीतम मोटर सायकल वरून गोवरी नाल्याकडे गेला अशी माहिती मिळाली. त्यानुसार शोध घेतला असता प्रीतम चा मृतदेह याच नाल्यात आढळून आला.
प्रितम च्या अश्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय पी. आर.साखरे व राजुरा पोलिस करीत आहे.