News 34 chandrapur
चंद्रपूर - जिल्ह्यात या वर्षीच्या पावसाने चांगलेच थैमान घातले असून अनेक ठिकाणी पूर आला आहे.चंद्रपुरात काही ठिकाणी इरई नदी व नाल्याचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.flood 2022
चंद्रपूर मनपा व जिल्हा प्रशासनाने नागरिकांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलविल्याने जीवित हानी झाली नाही, मात्र ग्रामीण भागात अनेक नागरिकांचा बळी उदभवलेल्या पुरामुळे गेला आहे. Chandrapur flood affected area
मूल व चिमुर तालुक्यात उमा नदीने थैमान घातले असून माजरी, घुग्घुस या ठिकाणी वर्धा नदीचा जलस्तर वाढल्याने अनेक भागात पाणी शिरले.
हजारो हेक्टर शेत पाण्याखाली गेले आहे.
सध्या जिल्ह्यातील पुढील मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. Maharashtra flood
बल्लारपूर तालुका 20.7.22
सकाळी 09.00 वाजता
1. चारवट, हडस्ती येथील ईरई नदीचे पुलावर जवळपास 7 ft पुराचे पाणी असल्याने दोन्ही गावाचा मार्ग बंद आहे.
2. बामणी येथील वर्धा नदी पुलावर पुराचे पाणी वाढल्याने बल्लारपूर राजूरा हैदराबाद मार्ग बंद
3.मोजा दहेली येथे वर्धा नदी चे पाणी वाढल्याने येथील 20 कुटुंबातील सदस्य यांना शाळेत रात्री ठेवण्यात आले.
4.चारवट येथील 18 कुटुंबातील सदस्य यांना नवीन चारवट येथे स्थलांतरित करण्यात आले.
5. बल्लारपूर येथील सर्व कोल माईन्स दिनांक 19.7.22 पासून संपूर्ण बंद ठेवण्यात आले आहे.
6.आज दिनांक 20 /7/22 रोजी बल्लारपूर तालुक्यातील बंद असलेले मार्ग खालिल प्रमाणे
1) बल्लारपूर - राजुरा हैदराबाद
2) बल्लारपूर सास्ती राजूरा
3) बल्लारपूर -विसापुर
4)पळसगाव -कवळजयी
5)हडस्ती -चारवट (पर्यायी मार्ग नाही)
6)चारवट -माना चंद्रपुर (पर्यायी मार्ग नाही
7) विसापूर ते नांदगाव
8) कोठारी ते तोहोगाव
हडस्ती, चारवट, जुनी चारवट, येथे सभोवताल परवा रात्री पासून पुराचे पाणी असल्याने संपर्क तुटला.