News 34 chandrapur
गुरू गुरनुले
मूल - मुल वरुन वाहणारी उमा नदी आणि आसोला मेंढा तलाव पूर्ण १०० टक्के भरल्याने तलावातून निघालेला वेस्ट वेअर म्हणजे चीमढा नदी असा इतिहास आहे. Uma river आणि चिमढा नदी ही मुल चामोर्षी मार्गाला जाणाऱ्या मुख्य रस्त्याला वाहणाऱ्या उमा नदीला जोडल्या गेली.दोन्ही नद्या एकत्र आल्याने मागील दोन दिवसापासून मुल चामोरशी नदी पुलावरून पुराचे पानी ओसंडून वाहत होते. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून चामोर्सी मार्ग बंद झाला झाल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली होती. येणाऱ्या जाणाऱ्या बोरचांदली, राजगड, चांदापुर, फिस्कुटी, विरई, गडीसुरला, जूनासुर्ला, बेंबाळ, भवराला नवेगाव भूजला व त्यापलिकडेही गावाची वाहतूक खोळंबली. करीता काही नागरिकांना व शाळेच्या शिक्षकांना देखील आकापुर मार्गाने किंवा भेजगाव मार्गाने जाणे येणे भाग पडले होते. Bridge flood water overflow
आज पुलावरून पानी ओसरल्याने वाहतूक सुरु झाली आहे. मात्र पुलावर पाण्याची काई, गाळ साचून असल्याने वाहतूक दारासाठी घसरण्याची भीती निर्माण झाली असून दुचाकी,चारचाकी,बैलबंडी सायकल स्वार यांचेसाठी देखील धोक्याची घंटा आहे. आणि बाजूला होत असलेल्या दुसऱ्या नवीन पुलाचे काम पूर्ण व्हायचे असल्याने वाहतुकीसाठी जुन्याच पुलाचा वापर करावा लागणार आहे. करीता जुन्या पुलावरील दोन्ही बाजूला कठडे त्वरित उभे करावे अशी मागणी तथा विनंती सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता श्री. प्रशांत वसुले यांचेकडे संपर्क साधून रुपेश पाटील मारकवार राजगड यांनी केली आहे.