News 34 chandrapur
चंद्रपूर - मागील दोन, अडीच वर्षांपासून डॉक्टरांसह आरोग्य सेवक कोविड-नॉन कोविड रूग्णांसाठी आपली सेवा देत आहेत. अनेकांनी आपल्या सुखी, चैनीत सुरू असलेल्या आरोग्य सेवेचा, जीवनशैलीचा त्याग करून मागील दोन वर्ष पूर्णवेळ समर्पित भावनेने रूग्णसेवेला दिली आहेत. त्यामुळे त्यांच्या या कार्याप्रती सजग नागरिक म्हणून कृतज्ञता व्यक्त करणे हे क्रमप्राप्त आहे.
Thank u doctor
Thank u doctor
आपला जीव धोक्यात घालून रुग्णांना जीवनदान देणाऱ्या डॉक्टरांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मनसेतर्फे डॉक्टरांच्या भेटी घेत सत्कार करण्यात आला. Mns adhikrut
जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर अमित डांगेवार यांनी कोविड काळात उल्लेखनीय कार्य केले तसेच रुग्ण व डॉक्टरांमधील कोणतेही अंतर न ठेवता एका फोनवर हजर होत जीवाची पर्वा सोडून दिवस रात्र रुग्णासाठी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला, बालरोग तज्ञ म्हणून जवळपास चाळीस वर्षांपासून एकाहत्तर वर्षाचे डॉक्टर ओमप्रकाश राठी हे देखील वयाची परवा न करता लहान मोठ्यांसाठी अविरत सेवा देत आहेत, तसेच औषध विशेषज्ञ व सामान्य चिकितस्क पडोली येथील संजीवनी मल्टिस्पेशालिस्ट रुग्णालयाचे डॉक्टर निखिल सोनकुसरे यांनी गरजू रुग्णांना कोविड काळात लुटनाऱ्या डॉक्टरांना आव्हान देत स्वतः अल्प फी आकारात कमी औषधोपचारात ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देण्याचे काम त्यांनी केले, अश्या डॉक्टरांच्या कार्याची दखल घेत मनवीसे तर्फे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, तालुकाउपाध्यक्ष मयूर मदनकर, तालुकासचिव करण नायर यांनी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ सन्मानचिन्ह देत सत्कार करण्यात केला.
यावेळी केलेल्या सन्मानाचा स्वीकार करत कार्याची दखल घेऊन सत्कार केल्याबद्दल डॉक्टरांनी मनसेचे आभार मानले व यामुळे रुग्णसेवा करताना ऊर्जा व बळ मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.