चंद्रपूर - महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही मंडळात पुरस्थितीतमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन स्थितीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांची कठीण परिक्षा पाहिली. परंतु न डगमगता महावितरणच्या अभियंता, कर्मचारी यांनी याही परिस्थितीमध्ये वीजपुरवठा ग्राहकांचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यात प्राधान्याने खांदाभर पाण्यात उतरुन ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला. जंगलात, अंधारात, पुराच्या पावसात त्यांनी कर्तव्य बजावले. Mseb
११ तारेखेपासून चंद्रपूर व गडचिरोली मंडळात उपकेंद्र, फिडर्स, रोहित्र लगेचच दुरुस्त करीत ग्राहकांना दिलासा दिला. यात महावितरणच्या अभियंता व कर्मचारी यांना स्थानिक प्रशासनाने तसेच जनतेने सहकार्य केले व यांना त्यांच्या कामाची पावती मिळाली. Power supply
राजूरा उपकेंद्रांतर्गत वीरुर स्टेशन परिसरात आलेल्या पुरामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. विरुर स्टेशन डी. सी. अंतर्गत येणाऱ्या धानोरा गावठाण आणि कवितपेट गावात वीज नसल्यामुळे गावात विजेची समस्या निर्माण झाली होती.परंतु राजुरा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. बडगु, व विरुर स्टेशनचे शाखा अभियंता श्री. मकासरे यांचा मार्गदर्शनात लाईनमन श्री. पुरोहित व इतर कर्मचारी तसेच एजन्सी च्या ले माणसानी गावातील वीज पुरवठा सुरू करण्यात शरतीने प्रयत्न केले व त्यात त्यांना यश आले. युथ फोरम धानोरा तर्फे आणि समस्त गावकरी मंडळी तर्फे वीज सेवा लवकर सुरू करण्यात आल्या बद्दल श्री मकासरे ,श्री पुरोहित आणि कर्मचारी बालाजी कारेकर यांचे मनापासून गावकऱ्यांनी आभार मानले.
power line
power line
दिनांक ३ जुलै रोजी सायं ७ वाजता अडपल्ली ते मुलचेरा ३३ विजवाहिनीमध्ये विजा व पावसामुळे अचानक बिघाड झाल्याने मुलचेरा वितरण केंद्रातील लाईन दुरुस्तीसाठी चपराळा अभयारण्याचा भाग असलेल्या गांधीनगर,वसंतपूर, लक्ष्मीपूर येथील जंगलात पोहोचले. काळ्याकुट्ट अंधारात, रात्री टॉर्च च्या मदतीने बिघाड शोधनणयास त्यांनी सुरुवात केली. सात तासाच्या अथक परिश्रमा अंती रात्री ३ चे दरम्यान अडपल्ली -मुलचेरा ३३ विजवाहिनीमध्ये पिन इन्सुलेटर चा बिघाड सापडला व पावणे चार वाजता तो दुरुस्त करण्यात आला. धो धो पडणारा पाऊस महावितरणच्या व कर्मचाऱ्यांचे सर्व लक्ष् बिघाड दुरुस्तीकडे. त्यामुळे सर्व नाले, तळे, ओढे एवढ्या वेळात दुथडी भरले अशाळी शेतकरी श्री जयदेव युधिष्टी महालदार रा लक्ष्मीपूर यांना या बळीराजाने महावितरण कर्मचाऱ्यांना वाट दाखवीत त्यांचा जीव वाचवला व त्यांना अंधारातून बाहेर काढले.
दिनांक ११ जुलैला चंद्रपूर मधील १ उपकेंद्रात बिघाड झाला व लगेच दुरुस्त करण्यात आला , तर गडचिरोलीतील ५ उपकेंद्रात बिघाड झाला व महावितरणच्या अभियंता, कर्मचारी यांनी प्रयत्नांची शर्यत करुन ४ उपकेंद्रांना पूर्ववत केले. १२ जुलैला, गडचिरोलीतील ७ उपकेंद्रात बिघाड झाला व सातही उपकेंद्रांचा बिघाड दुर करण्यात आला. १३ जुलैला चंद्रपूर ला ३ व गडचिरेालीला ३ उपकेंद्राती बिघाड लगेचच दुरुस्त करण्यात आला. १४ जुलैला ६ पैकी ६ तर गडचिरेालीत ६ पैकी चार उपकेंद्रातील बिघाड दुरुस्त करण्यात येत उर्वरीत दोन उपकेंद्रांना बॅकफिड करण्यात आले. तर १५ जुलैला गडचिरेाली १ उपकेंद्रात बिघाड झाला व तोही लगेच दुरुस्त करण्यात आला. गडचिरोली मंडळ आणि चंद्रपूर मंडळ अंतर्गत सर्व अभियंता यांनी जिल्हा प्रशासन, आणि स्थानिक प्रशासन यांना परिस्थिती अवगत करून देत, पावसाचे पाणी शिरलेल्या भागात विद्युत अपघात टाळण्यासाठी विजपुरवठा खंडीत ठेवला तर जिथे शक्य तेथे लवकरात लवकर ग्राहकांचा विजपुरवठा पूर्ववत केला.
Torrential rain
Torrential rain
वादळी वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे वीज वितरण यंत्रणा कोलमडून पडण्याच्या घटना बघता महावितरणने यावर्षी विशेष नियोजनातून मान्सुनपुर्व देखभाल व दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात राबविली होती. अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहजशक्य आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी २४ तास सुरु असणार्या कॉलसेंटर्सचे १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३४, १९१२०,१९१२ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोलफ्री क्रमांकावर वीजग्राहकांना तक्रार दाखल/ संपर्क साधता येईल. चंद्रपूर मंडलातील ग्राहकांनी ७८७५७६११९५ व गडचिरोली मंडलातील ग्राहकांनी ७८७५००९३३८ यावर संपर्क साधावा.