News 34 chandrapur
राजुरा - चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा जोर उतरला असला तरी काही ठिकाणी पुरजन्य स्थिती कायम आहे. Flood situation
राजुरा - बामणी मार्गावरील पूल आजही पाण्याखाली असल्याने वाहतूक खोळंबून गेली आहे, अश्यातच राजुरा-बामणी मार्गजवळ असलेले मोहम्मद शब्बीर यांच्या शेतात असलेल्या शेळी पालन केंद्रात पाणी शिरल्याने तेथील 16 शेळ्यांचा मृत्यू झाला. Goat farming
शेतात पाणी येणार नसल्याने शब्बीर यांनी शेळ्यांना बाहेर काढले नाही मात्र सकाळी पाण्याचा जोर वाढला आणि पाणी आत शिरले. Death of goats
शेळी पालन केंद्रात एकूण 27 शेळ्या होत्या त्यापैकी 16 शेळ्यांचा मृत्यू झाला तर 12 सुरक्षित आहे, घटनेची माहिती मिळताच तहसीलदार हरीश गाडे यांनी पाहणी केली.
वर्धा नदीचे पाणी आत शिरत असल्याने शब्बीर त्यावेळी शेतात होतात, त्यांनी आपला जीव वाचवित जवळच्या साईमंदिरात आश्रय घेतला. Chandrapur flood news
2 दिवसांपासून शब्बीर यांनी मंदिरात आश्रय घेतला होता प्रशासनाने शब्बीर यांना परत यायला सांगितले मात्र शेळ्यांसाठी ते परत आले नाही, मात्र आज 16 जुलै ला अचानक पाणी वाढले आणि सदर घटना घडली.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला, यावेळी शब्बीर यांनी नुकसान भरपाई ची मागणी शासनाकडे केली आहे.