News 34 chandrapur
चंद्रपूर - दुरुस्ती ते बांधकाम व उदघाटन पर्यंत वादात अडकलेल्या चंद्रपुरातील आझाद बगीचा पुन्हा नव्या वादात अडकण्याची चिन्हे दिसत आहे.शहरातील संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेने आझादी बगीचा येथे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले असल्याचा खळबळ जनक आरोप करण्यात आला आहे. Azad garden chandrapur
या आरोपानंतर पुन्हा आझाद बगीचा नव्या वादात अडकणार की काय असे चित्र पुन्हा दिसू लागले आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या अंतर्गत मौलाना अबुल कलाम आझाद बगीच्याच्या पुनर्विकास सौंदर्यीकरण कामासाठी तब्बल 6 कोटी 53 लाख 64 हजार 670 रुपये खर्च करण्यात आले.
मात्र उदघाटन होऊन काही महिने लोटल्यावर या बगीच्या मधील साहित्य जसे व्यायामाचे साहित्य, ग्रॅनाईट, पेव्हर ब्लॉक अक्षरशः तुटलेल्या अवस्थेत दिसत आहे.
कोट्यवधी रुपयांच्या कामात कंत्राटदाराने मोठया प्रमाणात भ्रष्टाचार केला असे दिसून येत आहे, याबाबत प्रशासनाने तात्काळ कंत्राटदारांची चौकशी तृतीय पक्ष चौकशी लावावी अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे. Third party investigation
मागील अनेक वर्षांपासून शहरातील मध्यभागात स्थित आझाद बगीचा मोडकळीस आला होता, सकाळ झाली की लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिक या बागेत नैसर्गिक वातावरणाचा आश्रय घेत होते, कालांतराने पूर्णतः बगीच्याला अवकळा आली.
जनतेनी बगीच्या चे सौंदर्यीकरण करावे अशी मागणी रेटून धरली, पालिकेने काम सुरू केले, 24 महिने कामाचा कालावधी असताना सुद्धा काम पूर्ण झाले नाही. Corruption news chandrapur
मेसर्स विजय घटे इंजिनिअरिंग कंपनीला काम देण्यात आले होते, संथगतीने कामाला सुरुवात झाली मात्र काही महिने लोटत नसताना बागेतील काँक्रिट रस्त्याला भेगा पडल्या, बगीच्या मधील साहित्य मोडकळीस आले, निकृष्ट दर्जाचे ग्रॅनाईट वापरण्यात आले, बसण्यासाठी खुर्च्याला तडे गेले, वॉकिंग ट्रॅक मधील पेव्हर ब्लॉक जागोजागी तुटून पडले. बांधकाम करण्यासाठी साहित्याच्या वापरात सर्व नियम पायदळी तुडविले. controversy
बगीच्या च्या पुनर्विकास कामात भ्रष्टाचार करण्यात आला, कंत्राटदारावर उच्च स्तरिय तृतीय पक्ष चौकशी करून सदर कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी जिलाधिकारींच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माजी मंत्री मुनगंटीवार, माजी मंत्री वडेट्टीवार,आमदार जोरगेवार, विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी,मनपा आयुक्तांना राजेश बेले यांनी केली आहे.