News 34 chandrapur
चंद्रपूर - Female Education society (एफ.इ.एस) द्वारा संचालित एफ.इ.एस.गर्ल्स कॉलेजची इयत्ता 12वीची विद्यार्थिनी कु श्रुती देवानंद मारबते हिला 2021-2022 या सत्रात झालेल्या परीक्षेतील संगीत विषयात 100 पैकी 99 गुण मिळाले आहेत.
Nagpur board merits
Nagpur board merits
नागपूर बोर्डातून श्रुती प्रथम आली असून सर्वत्र तिचे कौतुक केले जात आहे.श्रुतीच्या या नेत्रदीपक यशामुळे एफ.इ.एस.कॉलेजची मान उंचावली आहे, अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष ऍड.विजय मोगरे, सचिव ऍड.सातपुते,शाळा समितीचे अध्यक्ष गजानन गावंडे यांनी दिली आहे.संस्थेचे विश्वस्त शेंडे सर, श्रीमती पोटदुखे यांनी कौतुक केले असून श्रुतीने या यशाचे श्रेय प्राचार्य सौ बुटले,उपप्राचार्य सौ बेले व संगीत शिक्षिका सौ कुरेशी यांना दिले आहे.
Music subject topper
विसापुरवासी झाले आनंदित
श्रुती मारबते ही मुळात बल्लारपूर तालुक्यातील विसापूरची. तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक विसापूर येथे झाले.तिच्या पुढील शिक्षणासाठी तिचे आई वडील चंद्रपुरात वास्तव्यास आहेत. श्रुतीच्या यशाचे विसापुरातही कौतुक होत असून श्रुतीची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत असलेल्या वर्गशिक्षिका श्रद्धा भुसारी यांनीही कौतुक केले आहे.
विशेष - संगीत क्षेत्रातील विषयात विदर्भातून प्रथम येणाऱ्या श्रुतीला पुढील शिक्षणासाठी जिल्ह्यातील समाजसेवकांतर्फे आर्थिक मदतीची गरज आहे.

