News 34 chandrapur
चंद्रपूर - राज्याचं राजकारण हादरावणारे एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारसाहित खळबळ माजवून दिली. Y plus security
महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढत अपक्ष व शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजपला पाठिंबा देत राज्यात सरकार स्थापन करीत मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे विराजमान झाले.
एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना शिंदे सरकारने Y+ दर्जाची सुरक्षा प्रदान केली होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी व कार्यालयात अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली होती. Mla kishor jorgewar
मात्र आमदार जोरगेवार यांनी राज्य सरकार द्वारे देण्यात आलेली Y+ दर्जाची सुरक्षा नाकारली.
विशेष म्हणजे आमदार जोरगेवार हे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून अपक्ष म्हणून बहुमताने निवडून आले होते, जनतेत मिसळून त्यांची कामे करणारे लोकनेते म्हणून आमदार जोरगेवार यांची जनमानसात ओळख आहे.
सुरक्षा वाढल्याने जनतेचे काम करण्यास समस्या उदभवू नये यासाठी कदाचित आमदार जोरगेवार यांनी सुरक्षा नाकारली असावी.
Y प्लस सुरक्षा कमी करावी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्र देण्यात आले आहे.

