News 34 chandrapur
चंद्रपूर - जिल्ह्यात पावसाच्या हाहाकारानंतर आता समाजमाध्यमांवर अफवा पसरविण्याचे काम सुरू झाले आहे, 14 जुलै च्या सायंकाळी नगिनाबाग प्रभागातील सिस्टर कॉलोनी मध्ये रहिवासी क्षेत्रात मगर आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. Viral तो व्हिडीओ आज 15 जुलै पासून समाज माध्यमांवर सुसाट पसरत असून, सिस्टर कॉलोनी मधील नागरिकांची या व्हिडीओ मुळे चांगलीच घाबरगुंडी उडाली. Viral video
याबाबत News34 ने पडताळणी केली असता तो व्हायरल व्हिडीओ खूप जुना असल्याचे आढळले, विशेष म्हणजे तो व्हिडीओ चंद्रपूर जिल्ह्यातील नसून बाहेर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. हा व्हिडीओ मध्यप्रदेश राज्यातील होशंगाबाद या जिल्ह्यात असल्याचा दावा वर्ष 2020 मध्ये करण्यात आला होता मात्र तो व्हिडीओ गुजरात राज्यातील वडोदरा येथील असून वर्ष 2019 ला त्याठिकाणी आलेल्या पुरात हा मगर वाहून आला होता.
आधीचं चंद्रपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने नागरिकांना कसल्याही प्रकारची अफवा पसरवू नये असे आवाहन केले होते, social media viral video तसे केल्यास व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करू अशी प्रतिक्रिया प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनी दिली आहे. Crocodile in chandrapur
पूरपरिस्थिती मध्ये प्रशासन दिवस-रात्र नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर आहे, मात्र काही उत्साही नागरिकही अश्या प्रकारच्या अफवा पसरवीत आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाणे नागरिकांना कोणत्याही अफवेला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.