News34 chandrapur
चंद्रपूर/कोरपना - चंद्रपूर जिल्ह्यात मागील आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे, शहरात अनेक ठिकाणी पुराचे पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. Floodअनेक गावांना पुराचा फटका बसलेला असून बचाव पथक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवीत आहे.
कोरपना तालुक्यातील पकडीगुडम धरण हा ओवरफ्लो झाला असून नागरिक त्या धरणाच्या प्रवाहासमोर गर्दी करीत आपल्या जीवाची सेल्फी काढताना दिसत आहे. Dam overflow
आपल्या पर्यटनाची हौस भागविण्यासाठी स्वतः व अनेकांचा जीव टांगणीला लावण्याचे काही अतिउत्साही करीत आहे.
पकडीगुडम धरणाजवळ अनेक पर्यटक हजेरी लावत आहे, पोलीस प्रशासनाने बंदोबस्त लावत त्यांना बाजूला सारण्याचे काम करीत आहे मात्र पोलीस व प्रशासनाला न जुमानता नागरिक आपली हौस भागवित आहे. Chandrapur rain
धरणासमोर काही नागरिक सेल्फी तर काही मासेमारी करण्यासाठी गर्दी करीत जीवघेणा खेळ करीत होते.