News 34 chandrapur
चंद्रपूर - जिल्ह्यातील आलेला मुसळधार पाऊस आणि पुरजन्य स्थिती यंदा निर्माण झाल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाचे बचाव पथक अथक प्रयत्नाने पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे कार्य करीत आहे. Rescue operation
विरुर पोलीस व गडचांदूर पोलिसांच्या बचाव कार्यानंतर चंद्रपूर शहर पोलिसांनी पठाणपुरा गेट बाहेरील स्थित राजनगर व सहारा पार्क येथील नागरिकांचे रेस्क्यू आज सकाळी केले. Chandrapur police
सहारा पार्क व राजनगर हे भाग पूरग्रस्त असून दरवर्षी पडणाऱ्या पावसामुळे पुरसदृष्य स्थिती या ठिकाणी बघायला मिळते. Flood affected people
चंद्रपूर शहर पोलिसांची चमू व आपत्ती व्यवस्थानाच्या चमूने संयुक्त बचाव कार्य करीत आज सकाळी पुरात अडकलेल्या 37 नागरिक, 15 कामगारांना सुखरूप बाहेर काढले. Chandrapur flood news
मात्र राजनगर येथील 12 नागरिक यायला तयार नसून पोलीस प्रशासन त्यांना वारंवार सोबत येण्याची विनंती करीत आहे.
सध्या पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम गृह पोलीस उपअधीक्षक राधिका फाळके, सपोनि अतुल थुल, पोउपनी मिलिंद गेडाम, पोउपनी सुजित बंडीवार, हेड कॉन्स्टेबल दिलीप कुर्जेकर, परमेश्वर सरकटे व पोलीस पाटील सचिन दुधे हे करीत आहे.