चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात आठवडा भरात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने शहरातील रहमतनगर, सिस्टर कॉलोनी, वडगाव, नगिनाबाग या भागाला पुराच्या पाण्याचा जास्त फटका बसला होता. Flood affected area
पाऊस थांबला पण त्यानंतर पसरणाऱ्या रोगांचे काय? यासाठी शहरातील जनसेवेत पुढाकार घेणाऱ्या डॉक्टरांनी एक उपक्रम हाती घेतला.
चंद्रपूर प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते. Health camp
शहरातील अनेक केंद्रावर काही दिवसांपासून राहत असलेल्या नागरिकांच्या उपचाराकरिता बहुजन मेडिकल असोसिएशनने पुढाकार घेत प्रत्यक्ष केंद्रांना भेटी देत, लहान मुलांची तपासणी, उपचार व औषधोपचार केले. Flood situation
ज्या मुलांना उपचाराची अत्यंत आवश्यकता होती त्यांना खाजगी रुग्णालयात मोफत दाखल करण्यात आले. Free health Check up
बहुजन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी केंद्रातील प्रत्येक लहान मुलांची तपासणी केली.
समाजसेवेत नेहमी पुढाकार घेणारे बहुजन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. गावतुरे व संघटनेचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. public service
कोरोना काळात गावतुरे दाम्पत्यानी कोरोना बाधित रुग्णांना मोफत मार्गदर्शन केले होते.