News 34 chandrapur
चंद्रपूर - कोरोना काळात अनेक कार्यक्रमांवर शासनाने बंदी लावली होती, मात्र कोरोना रुग्ण कमी झाल्याने शासनाने बंदी उठवली असता आता हळूहळू विविध सामाजिक, राजकीय संघटनांनी एकत्र येत कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली आहे. News portal
अश्यातच दरवर्षी घेतला जाणारा श्रमिक पत्रकार संघ द्वारे आयोजित पत्रकार पुरस्कारिता कार्यक्रम ऑगस्ट महिन्यात घेण्याचे ठरविले आहे.
वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक माध्यम सहित पहिल्यांदा श्रमिक पत्रकार संघाने डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना महत्वाचे स्थान दिले आहे.
News portals मध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसाठी शोध पत्रकारिता पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
एप्रिल 2021 ते मार्च 2022 दरम्यान शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील समस्येला वाचा फोडणाऱ्या बातम्यांचा या वर्गवारीत समावेश असणार आहे.
Digital media award 2022
सदर पुरस्कार स्व.रामकुंवर उदय नारायण सिंह स्मृतीत प्रायोजित केला असून यामध्ये प्रथम व द्वितीय असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
नामांकणासाठी न्युज पोर्टल पत्रकारांना निर्धारित काळात प्रकाशित झालेली बातमीची 3 प्रतीत प्रिंट द्यावी लागणार आहे. प्रवेशिका जमा करण्याची अंतिम तारीख 7 जुलै आहे.
सदर पुरस्काराबद्दल अधिक माहितीकरिता अध्यक्ष श्रमिक पत्रकार संघ मजहर अली - 94221 37199, उपाध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर - +91 89757 55466, रमेश कल्लेपल्ली - +91 99708 93903 या क्रमांकावर सम्पर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

