News 34 chandrapur
चंद्रपूर - आजादी का अमृत महोत्सवाअंतर्गत "उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य -पॉवर @2047" हा कार्यक्रम भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय व नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय व महाराष्ट्रातील महावितरण, महानिर्मिती, महापारेषण व इतर भागीदार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाच्या सहकार्याने दि. २५ ते ३० जुलै या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. Msedcl
या महोत्सवांतर्गत चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर मंडलांतर्गत, "ऊर्जा क्षेत्रातील क्रांती आणि २०४७ पर्यंतचे ध्येय" या कार्यक्रमाचे, :- दि. २७.०७.२०२२ रोजी दुपारी १.०० वाजता बालाजी रायपूरे सभागृह, चिमूर, ता. चिमूर, जि. चंद्रपूर तथा दि. ३०.०७.२०२२ रोजी दुपारी ११.०० वाजता कन्नमवार सभागृह, मुल येथे आयोजन करण्यात आले आहे.
पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रासह केंद्र व राज्य सरकारच्या ऊर्जा क्षेत्रातील मागील ८ वर्षातील उत्कृष्ट कामगिरी बाबत माहिती देण्यास तथा विविध योजनांतील लाभार्थ्यांचा सत्कार व त्यांच्याशी संवाद साधन्यासाठी तसेच ऊर्जा क्षेत्रातील आव्हाने व २०४७ पर्यंतचे नियोजन याकरिता या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. Mseb
लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत केंद्र व राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या विविध योजनांची जसे एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रम, गतिमान विद्युत विकास कार्यक्रम, कुसुम योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, उच्चदाब वीज वितरण प्रणाली योजना, नवीन कृषी ऊर्जा धोरण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना, ग्रामस्वराज्य अभियान, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण विद्युतीकरण योजना, छतावरील सौर निर्मिती प्रकल्प, आधी योजना वर करण्यात आलेल्या कामावर, माहिती देण्यास प्रदर्शन, पोस्टरद्वारा, ध्वनीचत्राफितीमधून, नुक्कडनाटक, तथा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Azadi ka amrut mahotsav