News 34 chandrapur
राजुरा - पावसाचा पूर ओसरल्यावर शेतकरी रोवणी साठी शेतात जाऊ लागले, मात्र ही रोवणी एका शेतकऱ्याच्या जीवावर बेतली. Live electric wire
राजुरा येथील चीचबोडी या गावात 44 वर्षीय शेतकरी शेख शहाबुद्दीन शेख गफ्फार हा आज सकाळी शेतात रोवणी करायची असल्याने गेला होता.
त्यावेळी त्याच्या शेतातील वीज मंडळाच्या विद्युत पोल वरील एक जिवंत विद्युत प्रवाह असलेला वायर तुटून खाली शेतातील चिखलात पडला. Farmer die
तो जिवंत विद्युत तार शेतातील चिखलात पडला याची तिळमात्र कल्पना शहाबुद्दीन ला नव्हती. Mseb
त्यावेळी शेतात चिखलात असलेल्या विद्युत प्रवाहाच्या ताराचा संपर्क आल्याने तो शॉक लागून जागीच मरण पावला. यानंतर शेतात येणाऱ्या अन्य व्यक्तीला याची माहिती होताच गावात माहिती देण्यात आली. विद्युत प्रवाह बंद करून प्रेत बाहेर काढण्यात आले. साधारणतः विद्युत प्रवाह असलेली तार तुटल्यावर व त्याचा अर्थ ताराशी संपर्क येताच सब स्टेशन मधुन विद्युत प्रवाह खंडित होत असतो. मात्र, येथे असे न झाल्याने एका तरुण शेतकऱ्याला आपल्या प्राणाला मुकावे लागले. यामुळे गावात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
सदर प्रकरण युवक कांग्रेस पदाधिकाऱ्यांना माहिती होताच त्यांनी आक्रमक पवित्रा घेत मृतक शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीची 20 हजार रुपयांची मदत व 4 लाख रुपये मिळवून दिले.