News 34 chandrapur
ब्रम्हपुरी :- हरदोली गावालगत असलेल्या वैनगंगा नदी काठावर एका पाण्याच्या टाकीत मुलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सदर मुलगी ही कुरखेडा तालुक्यातील असुन मुलीची हत्या करून पाण्याच्या टाकी मध्ये शव ठेवल्याचे निदर्शनास आले. सदर हत्या प्रकरणातील अटकेतील आरोपी हे देसाईगंज येथील असुन एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे. Murder breaking
ब्रह्मपुरी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी हा फरार झाला आहे, पोलीस त्या आरोपीच्या मागावर असून लवकर त्याला अटक केली जाणार, त्यानंतर हत्येचा कारणांचा उलगडा होणार अशी माहिती पोलीस निरीक्षक रोशन यादव यांनी दिली. Crime news
सदर मृतदेहाला ब्रम्हपुरी पोलिसांनी उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले आहे.
घटनेचा पुढील तपास संबधित ब्रह्मपुरी पोलिस करीत आहे

