News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहीते यांनी भिवापुर वॉर्ड येथील सुपरमार्केटची पाहणी केली. तेथील मासे विक्रीच्या बाजाराची परिस्थिती पाहता त्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. Fish marketसदर मार्केट हा वर्दळीचा परीसर आहे, पावसाळा सुरु असल्याने चिखल निर्माण होतो, Kingdom of Dirt चिखलात मासे विक्री करावी लागु नये यादृष्टीने काँक्रीटीकरण करता येईल याचा आढावा घेतला. परिसरात उग्र वास, चिखल, किडे व घाणीचे साम्राज्य राहु नये. डासांचा त्रास होऊ नये यासाठी नियमित स्वच्छता करण्याचे निर्देश स्वच्छता विभागाला दिले. The Fresh Market - Supermarket
परिसरातील विक्री करणाऱ्यांची बैठक व्यवस्था बसण्यायोग्य करा, परिसरातील सार्वजनिक शौचालय सर्वांना वापरण्यायोग्य राहावे याची दक्षता घेणे, public toilet नियमित सफाई करतांना कुठेही अस्वच्छता, कचरा राहु नये यादृष्टीने नियोजन करण्यात ठेवा. सर्व कर्मचाऱ्यांनी आपली कामे जबाबदारीने करण्याचे निर्देश आयुक्त यांनी दिले आहेत.
याप्रसंगी शहर अभियंता महेश बारई, सहायक आयुक्त सचिन माकोडे, वैद्यकीय अधिकारी स्वछता डॉ. अमोल शेळके, उपअभियंता रवींद्र हजारे, संतोष गर्गेलवार उपस्थीत होते.

