News 34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही- चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो भगिनींच्या मागणीच्या सन्मान करत व जनतेला दिलेल्या शब्द पूर्ण करत तत्कालीन अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 2015 मध्ये दारू बंदी केली. Chandrapur alcohol ban
महाराष्ट्रात भाजप सत्तेवर असताना एप्रिल 2015 मध्ये जिल्ह्यात दारूबंदीचा धाडसी निर्णय घेण्यात आला. ' आता याला किती प्रमाणात सफलता मिळाले हे वेगळं सांगायचे गरज नाही. भाजपच्या कार्यकाळ संपल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाआघाडी सत्तारूढ झाली आणि सहा वर्ष बंद असलेले दारू दुकाने पुन्हा सुरू झाली. याच पार्श्वभूमी वर दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी कर्तव्यदक्ष पोलिसांनी आपल्या प्राणांची आहुतीही दिली. आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे सत्तेत "कमबॅक" होणार असल्याने जिल्हा परत एकदा दारूबंदी होणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. यामुळे दारू विक्रेत्यामध्ये चांगलेच धाकधूक वाढल्याचे चित्र दिसत आहे. पुन्हा भाजप सत्तेवर आल्यानंतर उभी बाटली आडवी होणार का याविषयी जन माणसात खलबत सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.
ठिकठिकाणी सुरू असलेल्या दारूबंदी बाबतची चर्चा ऐकून एकीकडे परवानाधारक दारू विक्रेते 'वेट अँण्ड वॉच' च्या भूमिकेत आहेत.
ठिकठिकाणी सुरू असलेल्या दारूबंदी बाबतची चर्चा ऐकून एकीकडे परवानाधारक दारू विक्रेते 'वेट अँण्ड वॉच' च्या भूमिकेत आहेत.

