News 34 chandrapur
राजुरा - सकाळच्या सुमारास पोलिसांना पेट्रोलिंग करीत असताना शहरातील सोमनाथ पूर वार्डात मोठ्या प्रमाणात शस्त्र लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली. Chandrapur police
पोलिसांनी लगेच एका घराची झाडाझडती घेतली असता त्यांना देशी बनावटीचे पिस्टल, देशी कट्टा, स्टील तलवार व चक्र असलेला घातक रॉड आढळून आला. Weapons supply
यामधील काही शस्त्र एका पान ठेल्यावर लपवून ठेवले होते, या प्रकरणात लवजोतसिंग हरदेव सिंग देवल या 18 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून यामध्ये अल्पवयीन बालकही सामील असल्याची माहिती पुढे आली आहे.
सदर शस्त्र राजुऱ्यात कश्यासाठी आणली व त्याचा उपयोग कश्यासाठी करणार होते याबाबत अद्यापही उलगडा झालेला नाही. 25 arms act
हे शस्त्र बिहार राज्यातून आली असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली असून सदर शस्त्रांचा पुरवठा कुणी केला हे चौकशी दरम्यान पुढे येणारचं.
अटक केलेल्या आरोपीवर Arms act कलम 3/4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार व पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.व्ही.दरेकर, पोलीस उप निरीक्षक हिराचंद गव्हारे, नागोराव भेंडेकर, संदीप बुरडकर, रामा भिंगेवाड यांनी केली आहे. section 25 arms act

