News 34 chandrapur
चंद्रपूर - राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आज चंद्रपूर दौ-यावर असतांना त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी पोहचत अम्माची भेट घेत अम्मा का टिफिन या उपक्रमाबद्दल माहिती जाणुन घेतली.
गरजवंतांसाठी सुरु असलेल्या अम्मा का टिफिन या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार राजु कारेमोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ग्रामीण चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर जिल्हाध्यक्ष राजिव कक्कड, नगरसेवक दीपक जयस्वाल, माजी नगरसेवक बलराम डोडाणी, संजय वैद्य, रोटरी क्लब चंद्रपूरचे प्रकल्प प्रमुख अजय जयस्वाल, आदिंची उपस्थिती होती.
गरजवंतांसाठी सुरु असलेल्या अम्मा का टिफिन या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार राजु कारेमोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ग्रामीण चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर जिल्हाध्यक्ष राजिव कक्कड, नगरसेवक दीपक जयस्वाल, माजी नगरसेवक बलराम डोडाणी, संजय वैद्य, रोटरी क्लब चंद्रपूरचे प्रकल्प प्रमुख अजय जयस्वाल, आदिंची उपस्थिती होती.
Ajit pawar
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार आज पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी भेट देत अम्माची म्हणजेच गंगुबाई जोरगेवार यांची भेट घेतली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपुरात सुरु करण्यात आलेल्या अम्मा का टिफिन या उपक्रमाचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी सदर उपक्रमाबद्दल त्यांनी संपूर्ण माहिती जाऊन घेतली. सदर उपक्रमाच्या माध्यमातून दररोज १०० टिफिन गरजूंच्या घरी पाठविले जात आहे. विषेश म्हणजे यात सातत्य असने ही मोठी गोष्ट असल्याचे सांगत या उपक्रमाचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कौतुक केले. Amma Ka Tiffinयावेळी सदर टिफिनही उघडुन पाहत जेवणाच्या दर्जाचे कौतुक केले. या प्रसंगी अजित पवार यांनी अम्माच्या प्रकृतीची विचारपुस करत यावेळी अम्मानेही मनमोकळेपणाने अजित पवार यांच्याशी बातचित केली. अम्माने गरिबीचे चटके सोसत कष्टाने कुटुंबाला सक्षम केले आहे. अम्माने आपल्या टोपल्या विकण्याचा व्यवसाय आजही सुरुच ठेवला आहे. याचेही अजित पवार यांनी कौतुक केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शाल, पुष्पमाला, बांबू निर्मित तिरंगा ध्वज, संविधान पुस्तिका, ग्रामगीता, देत अजित पवार यांचे स्वागत केले. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष सलिम शेख, अल्पसंख्याक युथ शहराध्यक्ष राशेद हुसेन, बंगाली समाज शहराध्यक्ष विश्वजित शाहा, करणसिंह बैस, राम जंगम, नकुल वासमवार, मुन्ना जोगी, प्रविन पिंपळशेंडे, राम मेंढे, नितिन शाहा, विक्की रेगंटीवार, गौरव जोरगेवार, दिनेश इंगळे, अल्पसंख्याक विभागाच्या महिला शहराध्यक्ष कौसर खान, सायली येरणे, आशा देशमुख, विमल कातकर, शमा काजी, अस्मिता डोणारकर, वंदना हजारे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.