News 34 chandrapur
चंद्रपूर - माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, राष्ट्रवादी कांग्रेसचे माजी शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात आलेल्या पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता आलेले विरोधी पक्ष नेता राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते अजित दादा पवार आले असता त्यांनी राष्ट्रवादी कांग्रेस कार्यकर्त्यांना वेळ दिला नाही व कांग्रेसचे खासदार धानोरकर व अपक्ष आमदार जोरगेवार यांच्या घरी दादा गेले मात्र स्वतः पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेळ दिला नाही.
सदर कार्यक्रम कोणत्या पक्षाचा हे समजले नाही, जिल्ह्यात पक्षाची काय स्थिती आहे याबद्दल साधी बैठकही पवार यांनी घेतली नाही.
इतकेच नव्हे तर दीपक जयस्वाल हे रहमतनगर भागातील माजी नगरसेवक आहे निदान पवार यांच्या पाहणी दौऱ्यात त्यांना साधी विचारणा ही करण्यात आली नाही.
पवारांच्या या वागण्याने दीपक जयस्वाल दुखावल्या गेले या कारणाने त्यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
News 34 सोबत बोलताना त्यांनी आपली खंत व्यक्त केली व आमच्या पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा वेळ नसेल तर त्या पक्षात राहून काय उपयोग, येत्या 2 दिवसात पुढील राजकीय भविष्याबाबत निर्णय घेणार अशी माहिती जयस्वाल यांनी दिली.
याबाबत राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांना सम्पर्क साधला आम्ही जयस्वाल यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया दिली.
काही महिन्यात चंद्रपूर मनपाच्या निवडणूका होणार आहे, त्याअगोदर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला लागलेला सुरुंग पक्षाची काय गत करणार हे निवडणुकीच्या नंतर समजेलचं.