News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथे झाशी राणी ब्रिज या ठिकाणी पोंभूर्णा मार्गे येणारे जड वाहतूक हे लालपेठ कामगार चौक येथून फिरून जाण्याच्या ऐवजी विरुद्ध दिशेने बुद्ध नगर या वार्डातून जातात ज्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी झाले आहेत अनेक अपघातामध्ये लोकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे.
Heavy traffic अर्धा अर्धा तास ट्रॅफिक जाम असते रस्त्यांची खराबी सुद्धा या जड वाहतुकीने वारंवार होत असते प्रशासनाला जनतेने वारंवार तक्रारी देऊन सुद्धा यावर कार्यवाही न झाल्याने येथील नागरिकांनी आपचे शहर सचिव राजू कुडे यांच्याकडे तक्रार दिली. Aam aadmi party यावर आम आदमी पार्टी चंद्रपूर तसेच बाबूपेठ येथील पदाधिकारी यांच्या नेतृत्वात वाहतूक नियंत्रण शाखा चे पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले. Traffic jam जर येत्या चार दिवसात विरुद्ध दिशेने येणारे जड वाहतूक थांबले गेले नाही तर बायपास वरील महामार्ग हा जनतेला सोबत घेऊन आम आदमी पार्टी रोखून धरेल आणि होणाऱ्या परिणामास पोलीस प्रशासन तसेच बांधकाम विभाग हे जबाबदार राहतील असे आपचे शहर सचिव राजू कुडे यांनी म्हटले आहे. यावेळेस आपचे बाबूपेठ प्रभागाचे अध्यक्ष इंजि. अनुप तेलतुंबडे, झोन 3 चे सचिव विनोद भाऊ रेबावार, सिद्धार्थ नगर वार्ड अध्यक्ष रूपम ताकसांडे, संजय पडोळे, कृष्णाजी सहारे, अजय बाथव, सागर बोबडे, कालिदास ओरके, अभिषेक टेंभुर्ने, जयदेव देवगडे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
![]() |