News 34 chandrapur
(गुरू गुरनुले)
मूल - कला,वाणिज्य,सायन्स, टेक्निकल, इंजिनिअरिंग असे कुठल्याही शाखेतील पदवी शिक्षण घेऊनच अनेक स्पर्धा उपलब्ध आहेत. त्यात उत्तीर्ण होऊनच स्वतःच करियर घडवावे लागते. त्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासाची जिद्द, चिकाटी,मेहनत घ्यावी लागते असे अमूल्य मार्गदर्शन करियर मार्गदर्शक विजय मुसळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना करुन विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले. Meritorious studentराजश्री शाहू महाराज जयंती निमित्त मूल येथील मा.सा.कन्नमवार सभागृह येथे भूमिपुत्र ब्रिगेड अ. भा.महात्मा फुले समता परिषद, अ.भा. माळी महासंघ जिल्हा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा आणि करियर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.अभिलाषा गावतुरे, प्रमुख अतिथी माजी आमदार देवराव भांडेकर, मुंबईचे विक्रीकर आयुक्त किरण गावतूरे,चंद्रपूर येथील प्रसिध्द सर्जन डॉ.संजय घाटे, ज्येष्ठ समाजबांधव माजी जी. प.सदस्य, प्रा.रामभाऊ महाडोळे, डॉ.सचिन भेदे, प्रा. केवल कऱ्हाडे,प्राचार्य अशोक झाडे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले ,पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक येरमे, ज्ञान ज्योती फाऊंडेशनचे अध्यक्ष दिनकर मोहुरले, आयोजक डॉ.राकेश गावतुरे,आदी मान्यवर उपस्थित होते. Career guidance for students
याप्रसंगी विक्रीकर आयुक्त किरण गावतुरे यांनी करियर घडऊन यशस्वी व्हायचे असेल तर दैनंदिन नियमितता,शिस्त, आत्मविश्वास अभ्यास केल्यास आपल्याही ग्रामीण भागातील मुले कलेक्टर, एस.पी. तहसीलदार होऊ शकतात असे मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. डॉ. संजय घाटे यांनीही वैद्यकीय मास्टर डिग्री बाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय विचार व्यक्त करतांना डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी आई वडिलांनी आपल्या मुली व मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न केले तर आपलेही मुले मुली पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. असे विचार व्यक्त केले.
याप्रसंगी डॉ. गुरनुले, डॉ. भेंडारे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सोबतच जिल्ह्यातील १०वी १२वी,पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्य आयोजक डॉ.राकेश गावतूरे यांनी केले. सूत्रसंचालन ऍड.सोनुले यांनी केले. कार्यक्रमाचे आभार नितीन गबाडे यांनी मानले.