गोंडपीपरी - चंद्रपूर जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे, अनेक ठिकाणी नदी, नाले ओसंडून वाहत आहे, या पावसाने शेतकरी वर्ग सुखावला असला तरी काहींना या पावसाच्या थैमानात जीव गमवावा लागला आहे. Heavy rainfall
अशीच एक दुःखद घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यात घडली, 3 वर्षीय चिमुकलीचा पाय घसरल्याने तुडुंब वाहत असलेल्या नाल्यात ती वाहून गेली व एका पुलाखाली अडकून पडली, यामध्ये त्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
3 वर्षीय सानू मंगेश चुनारकर रा. चिमडा मूल तालुका ही आपल्या आई-बाबा सोबत विठ्ठलवाडा येथे नातेवाईकांकडे 3 दिवसांपूर्वी आली होती.
जिल्हा व तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. Sad news
10 जुलैला सकाळी 9 वाजताच्या सुमारास घरासमोरील नालीजवळ उभी असलेली सानू चा अचानक पाय घसरला, नाल्यात पाणी तुडुंब वाहत असल्याने ती वाहून गेली, सदरचे दृश्य बघताच घरच्या मंडळींनी आरडाओरडा केला, 2 युवक त्या नालीत उतरले मात्र त्या प्रवाहात ती वाहून गेली.
नाली लगत असलेल्या पुलाखाली सानू अडकली, सानू ला बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले, 10 ते 15 मिनिटांनी नागरिकांनी पुलाखाली बांबू टाकला असता सानू पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाहेर निघाली.
बराच वेळ पाण्यात राहल्याने ती बेशुद्ध अवस्थेत होती.
नागरिकांनी तात्काळ तिला ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे नेले मात्र डॉक्टरांनी सानू ला मृत घोषित केले. Raining
सानू चा मृत्यू झाला असे समजताच आईने हंबरडा फोडला, सानू च्या मृत्यूने विठ्ठलवाडा परिसर शोकमग्न झाला.