News 34 chandrapur
ब्रह्मपुरी - ब्रह्मपुरी येथील वैनगंगा नदीच्या पात्रजवळ हरदोली येथील पंप हाऊस मध्ये 20 वर्षीय ऐश्वर्या खोब्रागडे या युवतीचा मृतदेह मिळाला होता. Murder crimeसदर युवतीचा मृत्यू 10 महिन्यांपूर्वी झाला होता.
पोलीस तपासात ऐश्वर्या चा खून करण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली, ऐश्वर्या चे डोके आपटून व गळा दाबून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. Murder mystery solve
ब्रह्मपुरी पोलिसांनी तांत्रिक तपासात तुषार बुज्जेवार याला अटक केली तर दुसरा आरोपी संदीप पटले हा फरार होता, पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली असून या प्रकरणात दोन्ही आरोपी अटकेत आहे.
तुषार ला अटक झाल्यावर संदीप पटले रा.वडसा हा पसार झाला होता, 10 महिन्यांपूर्वी केलेली हत्या याचा कुणाला सुगावा लागणार नाही अशी कल्पना त्याला होती, मात्र ऐश्वर्या चा मृतदेह मिळाल्यावर तो पसार झाला, पोलिसांच्या पथकाने त्याला वडसा हद्दीत येणाऱ्या वैनगंगा नदीच्या पुला खालून अटक करण्यात आली, संदीप ची कसून चौकशी केल्यावर त्याने ऐश्वर्या चा खून केला असल्याची कबुली दिली.
पोलीस तपासात पोलिसांना आश्चर्यचकित करणारी माहिती मिळाली, आरोपी संदीप पटले यांचेवर वडसा पोलीस ठाण्यात 2018 ला हत्येचा गुन्हा दाखल व गोंदिया पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. आरोपी संदीप हा रागिष्ट स्वभावाचा आहे. Chandrapur police
सदरचा यशस्वी तपास अरविंद साळवे पोलीस अधिक्षक, जि . चंद्रपूर, मल्लिकार्जून इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुल, अतिरीक्त कार्यभार ब्रम्हपूरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन ब्रम्हपूरीचे ठाणेदार रोशन यादव, सपोनी प्रशांत ठवरे, पोउपनी सुरेंद्र उपरे पोहवा / अंकूश आत्राम, नापो / सचिन बारसागडे, मुकेश गजबे, योगेश शिवनकर, पोशी / विजय मैंद, संदेश देवगडे, अजय कटाईत व पोलीस स्टेशन ब्रम्हपूरीमधील स्टॉफ यांनी ही कामगीरी केली . सदर गुन्हयाचा तपास मल्लिकार्जून इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी मुल, अति कार्य ब्रम्हपूरी हे करीत आहेत.