चिमूर - ताडोबा बफर झोन खंडसंगी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या अलिझंझा येथील इसम वाघाच्या हल्ल्यात ठार झाला आहे. Tiger attack
ही घटना सायंकाळच्या सुमारास घडली.अलिझंजा येथील सीताराम नन्नावरे ( वय 65 ) हा किटाळी गावालगत असलेल्या हेटी शेत शिवार परिसरात स्वतःच्या मालकीचे जनावर चारत होता. Tadoba tiger
जनावरे चराई करीत असताना हा विश्रामासाठी एका झाडाखाली बसला होता. त्याचवेळी वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. याची माहिती इतर गुरख्यानी गावात येऊन दिली. घटनेची माहीती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा केला आहे. human wildlife conflict
मागील काही दिवसापासून वाघाचे दर्शन सामान्य माणसांना होत आहे.त्यात वाघाचे हल्ले होत असल्याने गावागावात दहशत पसरली आहे.