News 34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - तालुक्यातील नवरगाव चिमूर कडे जाणाऱ्या एमआयडीसी जवळील डांबरीकरण रस्त्याला चार ते पाच फुटाचा मोठा खड्डा स्वरूप भगदाड पडलेले आहे. सिंदेवाही- चिमूर मार्गावर असलेल्या शहरा जवळ असलेल्या एमआयडीसी जवळ रस्त्याला पाच फुटाचे भगदाड पडले आहे. नवरगाव- रामाळा वासेरा शिवनी कडे जाणारी वाहतूक जास्तीत जास्त प्रमाणात आहे.
Big hole in the road
Big hole in the road
या रस्ता मार्गाने सिंदेवाही शहरात येणारे शाळेतील विद्यार्थी तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणात येणे जाणे करत असतात हा रस्ता नेहमीच वर्दळीचा असल्याने या मोठे भगदाड झालेल्या रस्त्याने ट्रक, बस,ऑटो, टँक्टर, चार चाकी तसेच दुचाकी वाहने ये-जा करत असतात. या रस्त्यावर भगदाड पडले असल्याने मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. Accidents due to potholes
बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन सिंदेवाही शहरातील एमआयडीसी च्या रस्त्यावरील पडलेल्या त्या मोठ्या भगदाडाची योग्य ती दुरुस्ती करावे. जेणेकरून या रस्त्यावर मोठे अपघात होणार नाही. अशी सिंदेवाही शहरात येणाऱ्या प्रवाशी नागरिकाकडून मागणी केली जात आहे. Villagers suffering due to potholes