News 34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - तालुक्यातील एका व्यक्तीच्या तक्रारीवरून सिंदेवाही पोलिस स्टेशन येथे ब्रह्मपुरी तालुक्यातील एका व्यक्तीने फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसात 420 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Fraud case
Fraud case
फिर्यादी घोनमोडे राहणार मोहाळी येथील या व्यक्तीने स्वतःच्या मालकीचे ट्रॅक्टर ट्रॉली tractor trolly वाहन क्रमांक एम एच- 34 बिव्हि- 0527 हे वाहन भाडेतत्त्वावर सुरज विखार राहणार ब्रह्मपुरी यांना दिले होते. काही दिवसानंतर घोणमोडे यांनी आपल्या भाडेतत्त्वाने दिलेल्या ट्रॅक्टर ट्राली चे पैसे मागण्या करीता सुरज विखार यांच्याकडे गेले असता, सुरज ने पैसे देतो म्हणून वारंवार तो नकार देत होता त्यामुळे ट्रॅक्टर ट्रॉली मालक घोणमोडे यांनी सविस्तर चौकशी केली असता सदर ती ट्रॅक्टर ट्राली सुरज विखार यांनी कीशोर सहारे नामक राहणार अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया यास वहीवाटी करिता दिली. त्यामुळे सुरज विखार यानी फसवणूक केल्याप्रकरणी घोनमोडे यांनी सिंदेवाही पोलिस स्टेशन गाठत सुरज विखार याच्या विरोधात तक्रार दाखल केली. Rented vehicle
Crime त्यानुसार लगेच सिंदेवाही पोलिसांनी तक्रार तपासात घेऊन आरोपी सुरज विखार याला अटक करून अप. क्रमांक 181/ 2022 नोंद करीत कलम 406, 420 भारतीय दंडविधानानुसार गुन्हा दाखल केला.
Crime त्यानुसार लगेच सिंदेवाही पोलिसांनी तक्रार तपासात घेऊन आरोपी सुरज विखार याला अटक करून अप. क्रमांक 181/ 2022 नोंद करीत कलम 406, 420 भारतीय दंडविधानानुसार गुन्हा दाखल केला.
प्राथमिक तपास संदीप कोवे यांनी केला असून पुढील तपास पीएसआय महल्ले हे करीत आहेत.

