News 34 chandrapur
गुरू गुरनुले
मुल - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक farmer cm vasantrao naik यांनी कृषी क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी केली आहे. आपल्या राज्यात हरितक्रांती ची मुहूर्तमेड मा. वसंतराव नाईक यांनी रोवली. फलोत्पादन, रोजगार हमी योजना इत्यादी योजना राबविण्यात त्यांच्या मोलाचा वाटा आहे त्यांची कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन वसंतराव नाईक यांच्या जयतीनिमित्त आपल्या राज्यात दरवर्षी जुलै हा दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून तर सदर आठवडा हा कृषि संजीवनी सप्ताह म्हणुन साजरा करण्यात यावा असे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे.
या दरम्यान शेतकरी बांधव यांचे पर्यंत उन्नत कृषी तंत्रज्ञान पोहोचावे या करीता विविध लोकाभिमुख कार्यक्रम राबविण्यात येतात. त्याच अनुषंगाने कृषि महाविद्यालय, मुल (सोमनाथ) येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) सत्रातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी त्यांना नेमुन देण्यात आलेल्या आठ गावामध्ये कृषी संजीवनी सप्ताह दिनांक २५ जुन ते 1 जुलै दरम्यान उत्साहाने साजरा केला.
या दरम्यान शेतकरी बांधव यांचे पर्यंत उन्नत कृषी तंत्रज्ञान पोहोचावे या करीता विविध लोकाभिमुख कार्यक्रम राबविण्यात येतात. त्याच अनुषंगाने कृषि महाविद्यालय, मुल (सोमनाथ) येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) सत्रातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी त्यांना नेमुन देण्यात आलेल्या आठ गावामध्ये कृषी संजीवनी सप्ताह दिनांक २५ जुन ते 1 जुलै दरम्यान उत्साहाने साजरा केला.
ग्रामीण कृषी कार्यानुभव सत्रा दरम्यान या महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांना नेमुन देण्यात आलेल्या खेड्यामध्ये राहुन प्रत्यक्ष शेती कश्या पद्धतीने केली जाते, सोबतच शेतकरी बांधव वापरीत असलेले तंत्रज्ञान, शेती पद्धतीत येत असलेल्या अडचणी याचा अनुभव ग्रहण करीत आहेत. कृषी संजीवनी सप्ताहाचा मुख्य हेतु उन्नत कृषी तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकरी बांधव याच्यापर्यंत या करीता महाविद्यालयातील विद्याथ्यांच्या वतीने, प्रगतिशील शेतकरी संवाद दिन, शेतीपूरक व्यवसाय दिन, महित्य कृषी तंत्रज्ञान सक्षमिकरण दिन इत्यादी कार्यक्रम सिंदेवाही तालुक्यातील लोणवाही, सरडपार राजीली व एकार्जुना तालुक्यातील नंदोरी (बु.), कळमगव्हाण, जामगाव (खुर्द), तुळाना व चिनोरा या गावामध्ये विविध कार्यक्रम राबविण्यात आलेत. ज्यामध्ये प्रामुख्याने तुळाना येथे वृक्षदिंडीचे आयोजन, किटकनाशके वापरतांना घ्यावयाची काळजी, शेतकरी बांधव यांच्यासाठी कृषी प्रश्नमंजुषा, जामगाव (खुर्द) येथे जनावरांचे लसीकरण, राजोली येथे भितीपत्रकाद्वारे कृषी तंत्रज्ञान प्रचार व प्रसार, चिनोरा गावामध्ये शेतकरी संवाद दिन, लोणवाड़ी येथे महिला बचत गटातील महिलासाठी शेती पुरक व्यवसाय, सरहपार येथे चारा प्रकिया व बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले व दिनांक १ जुलै रोजी या गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या सप्ताहा दरम्यान विद्याथ्र्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोलाच्या माध्यमातुन पिकांचे उन्नत वाण, कृषी अवजारे, सेंद्रिय शेती पद्धती,
विद्यापीठाद्वारे देण्यात आलेल्या संशोधनात्मक शिफारसी इत्यादी बाबींचा त्यांना नेमुन देण्यात आलेल्या गावांमध्ये प्रचार व प्रसार केला.
या सोबतच सिंदेवाही तालुक्यातील लोणवाही व एकार्जुना तालुक्यातील तुळाना येथे या विद्याथ्र्यांनी गावात उपलब्ध भौतिक, नैसर्गिक संसाधने या बाबत शेतकरी बांधव अवगत व्हावे या करीता दोन्ही गावांचे गावकयांच्या मदतीने सहभागी ग्रामीण मुल्याकंन (PRA) केले. हे मुल्यांकन करण्याकरीता शेतकरी बांधव यानी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
कृषी संजीवनी सप्ताह दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्याकरीता डॉ. विष्णुकांत टेकाळे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमाकांत गजभिये, प्राध्यापक डॉ. शैलेश सरनाईक, कार्यक्रम अधिकारी व डॉ. दिनेश नवलकर, सोबतच महाविद्यालयातील सर्व विषय विशेषज्ञ यानी तात्रिक मार्गदर्शन केले. कृषी संजीवनी सप्ताह यशस्वीपणे साजरा करण्यासाठी कृषी विभागातील कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, त्या त्या गावात कार्यरत कृषी सहाय्यक, गावातील सरपंच, पोलीस पाटिल तसेच गावकरी मंडळी याचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी झाडे, कु. चेतना खरबडे, कु. मृदुल धोरे सोहम रागीट, शुभम डगे, सुरज बरमाडे, रविंद्र घोगरे, वैभव पावडे यांचेसह ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) सत्रातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.

