News 34 chandrapur
चंद्रपूर - दुर्लभ रक्ताची नागपुरातील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज मध्ये भरती असणारे पूनम कहव यांना A2B निगेटिव्ह रक्ताची गरज पडली, मात्र नागपुरात ते उपलब्ध झाले नसल्याने शहरातील सेवा फाउंडेशन चे राज खंडारे यांनी चंद्रपुरातील रक्त दूत रिंकू कुमरे यांच्याशी संपर्क साधला. Blood donar
खंडारे यांनी रुग्णाची स्थिती समजावीत मागील 2 दिवसापासून रक्त मिळत नसल्याची बाब सांगितली.
रुग्णसेवा म्हणून रिंकू कुमरे यांनी तात्काळ दुर्लभ A2B निगेटिव्ह डोनर चंद्रपुरातील सूरज रामिडवार यांच्याशी संपर्क साधला. Rare blood group
मात्र अर्ध्या तासात संजीवनी ब्लड बँकेत रक्तदान करीत चंद्रपुरातील DNR बस ने दुर्लभ रक्त नागपुरात पोहचविण्यात आले.
चंद्रपुरातील रक्त संयोजक रिंकू कुमरे, रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशनचे हकीम हुसेन, भद्रावती येथील जय राजभर, पंकज चालखुरे, राज खंडारे व राहुल आवाटे यांनी या सेवकार्यात मोलाची कामगिरी बजावली.