News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात आलेल्या पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.
जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पूर परिस्थितीची पाहणी केल्यावर पत्रकार परिषदेत पूर परिस्थिती बद्दल माहिती देत, सध्या लाखो हेक्टर शेत पाण्याखाली आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. Nana patole
राज्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थितीने बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 75 हजारांची मदत सरकारने करावी अशी मागणी विधानसभेत कांग्रेस उचलून धरणार अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली.
राज्यात सुरू असलेले सत्ता नाट्य गंभीर असून आज महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही, ED मुळे ED (एकनाथ, देवेंद्र) सत्ता राज्यात स्थान झाली.
पण मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने अनेक कामे रखडून गेली आहे, जनतेचा कुणी वाली नाही, राज्यात व स्थानिक स्वराज्य संस्थेत पुन्हा महाविकास आघाडी एकत्र येत निवडणूक लढणार का या प्रश्नावर पटोले यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.
आयोजित पत्रकार परिषदेत कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
