News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - दी. 30जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे विधानमंडळ लोक लेखा समितीचे अध्यक्ष विकास पुरूष लोकनेते, माजी अर्थ, नियोजन मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस मुल तालुक्यातील ग्रामीण भागात मौजा नवेगाव (भूजला) भव्य रक्तदान शिबिर आयोजित करुन साजरा करण्यात आला.रक्तदान शिबीराच्या आयोजनासाठी मुल पंचायत समितीचे माजी उपसभापती,तथा भाजपा तालूका सरचिटणीस अमोल पाटील चुधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी भाजप महीला मोर्चा जिल्हा सरचिटणीस तथा संजय गांधी निराधार योजना समितीच्या माजी अध्यक्षा सौ. वंदना अगरकाठे, युवा नेतृत्व संजय येणूरकर, मुल पंचायत समितीचे माजी सभापती चंदू मारगणवार, गावातील सरपंच, उपसरपंच व सर्व गावकरी मंडळी ग्रामपंचायत सदस्य गण गावातील सुज्ञ नागरिक प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घेतला होता. भाऊंच्या वाढदिवसा निमित्त गावातील युवक,महिला, नागरिक उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान दिले यामधे अमोल चुदरी,वंदना आगरकाटे, चंदू मार्गोंनवार आणि युवकांनी रक्तदान देऊन वाढदिवस साजरा केला.
