News 34 chandrapur
राजुरा : आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत चुनाला ग्राम पंचायतीने आपल्या विश्राम गृहाच्या परिसरात मागील तेहत्तीस वर्षांपूर्वी लावलेल्या विविध जातीच्या करोडो रुपये किमतीच्या झाडांसोबत माजी आमदार सुदर्शन निमकर व संजय धोटे यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केला आहे.
तालुक्यातील चुनाळा ग्रामपंचायत चे लोकाभिमूख सरपंच बाळूभाऊ वडस्कर यांच्या पुढाकारातून वृक्षारोपणचा कार्यक्रम घेण्यात आला. या ग्राम पंचायतीचे वैशीष्ठ म्हणजे ग्राम पंचायतीच्या मालकीच्या सात एकर जमिनिवर सन 1989 पासुन हजारो साग व इतर मौल्यवान झाडांची लागवड करुन काटेकोरपणे जोपासना केल्यामुळे अस्तित्वात असलेल्या झाडांची अंदाजीत कींमत दोन कोटी रुपये पर्यंत झाली आहे. ग्राम पंचायतीने खऱ्याअर्थाने सुधीरभाऊ च्या 33 कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाची पुर्तता करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. याप्रसंगी गेल्या अनेक वर्षा पासुन लावलेल्या झाडांना जगवुन भाऊच्या वाढदिवसा सोबत जगवलेल्या झाडांचा सुद्धा वाढदिवस चुनाळा चे माजी सरपंच संजय पावडे यांचा सुद्धा योगायोगाने वाढ दिवस असल्यामूळे त्यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. teak tree
त्याप्रसंगी भाजप चे तालुका अध्यक्ष तथा जि.प.चे माजी सभापती सुनिल उरकूडे, अरुण भाऊ मस्की, सतिश धोटे, राजेंद्र डोहे, विनायक देशमुख, हरिदास झाडे, प्रशांत घरोटे, दिलीप वांढरे, सचिन डोहे, सचिन शेंडे, सईद भाई कुरेशी,प्रदीप बोबडे,जनार्धन निकोडे, पराग दतारकर, ग्रा.पं.चे सदस्य राकेश कार्लेकर, रविंद्र गायकवाड, उषा करमनकर, दिलीप मामा मैसने, प्रफुल चौधरी, प्रविण साळवे , शंकर धूमने, घनशाम कार्लेकर चैनलाल नाईक,मारोती चुदरी सह प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थीत होते. ग्रा.पं.चे कर्मचारी व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
