News 34 chandrapur
ब्रह्मपुरी - 10 महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली होती, सदर तरुणी ही गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील रहिवासी होती. Murder mystery
गडचिरोली जिल्ह्यातील तरुणीचा मृतदेह ब्रह्मपुरी येथे आढळल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
10 ऑगस्ट 2021 पासून ऐश्वर्या खोब्रागडे ही 20 वर्षीय तरुणी बेपत्ता होती, ऐश्वर्या ब्रह्मपुरी येथील महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत होती, ती अचानकपणे बेपत्ता झाल्याने ऐश्वर्या चे वडील डॉ. दिगंबर खोब्रागडे यांनी ब्रह्मपुरी येथे 27 ऑगस्ट 2021 ला पोलीसात तक्रार दिली होती. Crime scene
त्यावेळी ऐश्वर्या ची माहिती मिळाली नव्हती मात्र 10 महिन्यांपूर्वी ऑगस्ट महिन्यात तिची हत्या करून मृतदेह हरदोली येथील वैनगंगा नदीच्या पात्राजवळील असलेले पंप हाऊस येथे टाकण्यात आला.
घटनेच्या 10 महिन्यानंतर ऐश्वर्या चा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे झाले, मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे वडसा येथे राहणारा तुषार राजू बुज्जेवार याला अटक करीत चौकशी केली असता त्याने सांगितले की मृतक ऐश्वर्या ला संदीप पटले नामक युवक हरदोली शिवारातील वैनगंगा नदीच्या पात्राजवळील असलेल्या पंप हाऊस च्या भिंतीवर दोनदा ऐश्वर्या चे डोके आपटले त्यांनतर तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याची खळबळजनक माहिती तुषार ने पोलिसांना दिली. Aishwarya murder mystery
ऐश्वर्या चे प्रेत नाहीसे करण्यासाठी पंप हाऊस मधील विहिरीत तिचा मृतदेह फेकण्यात आला. तिची बॅग जवळ असलेल्या झुडपात फेकली. Brutal murder
ऐश्वर्या चा मृतदेह मिळाल्यावर तिचा जीन्स पॅन्ट, मृतकाची चप्पल व साहित्याच्या आधारे वडिलांनी पडताळणी करीत हीच ऐश्वर्या असल्याचे सांगितले होते.
आरोपी तुषार बुज्जेवार याला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी संदीप पटले हा फरार आहे, त्याचा शोध घेण्यासाठी ब्रह्मपुरी पोलिसांनी पथक आरोपीच्या मागावर पाठवले आहे.
ऐश्वर्या च्या हत्येच्या कारणाचा उलगडा दुसरा आरोपी अटक झाल्यावर समजेल अशी माहिती पोलिसांनी दिली.

