News 34 chandrapur
गुरू गुरनुले
मूल - यावर्षीच्या शैक्षणिक सत्राला नुकतीच सुरुवात झाली असून मुल तालुक्यातील चिखली ग्राम पंचायतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रमाचे आयोजन करुन शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे आगमन होताच ग्रा.पं. सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे पूषगुछ देऊन स्वागत केले. Rular student educationतसेच विद्यार्थ्यांना पाट्या,पेन्सिल, नोटबुक,वही, अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येऊन सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच नंदुजी नैताम, उपसरपंच तर प्रमुख अतिथी प्रा.दुर्वास कळसकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश कडस्कर, ग्राम विकास अधिकारी सौ.चीमुरकर मॅडम, जी.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.गेडाम सर, सदस्य पंकज कडस्कर इतर ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ शिक्षक पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढून शैक्षणिक जनजागृती पर जयघोष नारे देण्यात आले.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्राम पंचायत तर्फे सरपंच,उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सर्व ग्राम पंचायत सदस्य यांचे हस्ते चिखली ३ व बेलगाट १ अशा चार अंगणवाडी शिक्षिकांना वजन काट्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे गावात कौतुक केले जात आहे.