News 34 chandrapur
राजुरा - 29 जून ला रात्री वर्धा नदीच्या पुलावरून 23 वर्षीय अल्पेश लोचन व्याहाडकर या मुलाने उडी मारत आत्महत्या केली.
अल्पेश हा राजुरा तालुक्यातील पांढरपौनी येथे राहत होता, सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाही. Suicide case
30 जून ला पोलीस विभागाने वर्धा नदीत सर्च ऑपरेशन केले असता दुपारच्या सुमारास पोलीस कर्मचारी अशोक गरगेलवार, मंगेश मत्ते, वामन नक्षीने, दिलीप चव्हाण, गिरीश मरापे, अजित वाहे, सुजित मोगरे व अतुल चहारे यांना अल्पेशचा मृतदेह आढळला.
अल्पेशचा चा मृतदेह वडिलांनी आपल्या मांडीवर घेतल्यावर त्यांना रडू कोसळले, अवघ्या 23 वर्षाचा मुलगा असं पाऊल उचलणार याबाबत कुणालाही कल्पना नव्हती.