News 34 chandrapur
चंद्रपूर - जिल्ह्यात आज मोठया प्रमाणात सुगंधित माफिया सक्रिय असून जिल्ह्यातील युवा वर्गाला कॅन्सर सारखा भयावह आजार हा माफिया फक्त 20 रुपयात देत आहे. Fragrant tobacco mafia
अन्न व औषध विभाग आजपर्यंत या सुगंधित तंबाखू माफियांचा पुर्णपणे नायनाट करू शकले नाही, मात्र या माफियांकडून पैसे घेत त्यांचा बचाव करणारी टोळी चंद्रपुरात सक्रिय झाली आहे. Ransom seeker
पठाणपूरा भागात शंकर रागीट यांचं किराणा दुकान असून 27 जून ला तनशील पठाण व त्याचे काही सहकारी रागीट यांच्या दुकानात शिरले व तुम्ही सुगंधित तंबाखूचा व्यवसाय करतात असे म्हणत व्हिडीओ काढत आम्ही चौकशीसाठी आलो आहे, असे म्हटले व त्यानंतर रागीट यांचेकडून पठाण यांनी 1 लाख रुपये घेतले. Blackmail
त्यानंतर 30 जून ला पुन्हा पठाण यांनी रागीट यांच्याशी संपर्क साधत तो व्हिडीओ डिलीट करायचा असेल तर 10 हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी रागीट यांना केली. Crime news
यावेळी परिसरातील नागरिकांनी तनशील पठाण याला पकडले मात्र त्याच्यासोबत असलेले 3 ते 4 जण पळून गेले, नागरिकांनी पठाण याला शहर पोलिसात नेले.
अशी फिर्याद शंकर रागीट यांनी आपल्या तक्रारीत दिली आहे, पोलिसांनी तनशील पठाण याला अटक करीत त्यांचेवर कलम 452, 384, 385 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी इतर आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. सदर आरोपी हा समाजवादी पक्षाचा पदाधिकारी सुद्धा आहे.
आज पत्रकार म्हणजे समाजातील समस्यांना वाचा फोडण्याचे काम करतो मात्र काळ बदलला आणि पत्रकारिता फक्त खंडणी उकळण्यासाठी केली जात आहे, काही दिवसांपूर्वी बाबूपेठ मध्ये सुद्धा अशीच वसुली करण्यात आली होती त्या प्रकरणाची तक्रार मात्र झाली नाही. जिल्ह्यात सुगंधित तंबाखू तस्करी वाढत आहे आणि त्यांच्याकडून पैसे घेत माफियांना अभय देण्याचे काम बोगस व भुरटे पत्रकार करीत आहे, अश्या वृत्तीने आज प्रामाणिक पत्रकारांना नाव बोटे ठेवले जाते.
पोलिसांच्या या कारवाईने अश्या भुरट्या पत्रकारांची झोप मात्र नक्की उडेल.
या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असून, पोलीस त्या आरोपींचा शोध घेत आहे. एसडीपीओ नंदनवार, ठाणेदार सुधाकर अंभोरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल, शरीफ शेख, इमरान खान, चेतन गज्जलवार, सचिन बोरकर, विलास निकोडे यांचे पथक पुढील तपास करीत आहे.