News 34 chandrapur
चंद्रपूर - पावसाळा आला की अनेक वन्यजीव आपल्याला सहज कुठेही आढळून येतात, मात्र सर्वात जास्त बाहेर पडणारा जीव म्हणजे साप, याला बघताच नागरिक किंचाळू लागतात, मात्र काही नागरिक चक्क सापाला मारून टाकतात.कुणालाही घरी साप दिसला की सापाला पकडण्यासाठी काय करायचं? त्याला बाहेर कसे हाकलून लावायचे हा प्रश्न नेहमी समोर उभा असतो, नागरिक कधीही सर्पमित्राला संपर्क साधत नाही, कारण अनेकदा सर्पमित्र कोण? त्यांचा सम्पर्क क्रमांक काय हे वेळेवर आपल्याला आठवत नाही.
मात्र News34 च्या माध्यमातून साप आढळल्यास काय करावे व शहरातील कोणत्या भागातील सर्पमित्राला आपण सम्पर्क करावा याबाबत एक जनजागृती करण्यात येत आहे.
Snake friend
मित्रांनो पावसाळा सुरु झाला आहे. खास करून शेतीचे काम आता जोरात सुरु झाले आहेत. पाणी आला कि सापाचा बिळात पाणी जाते व ते बाहेर निघतात. आणि तुमचा भेटीला दार न वाजवता कधीही येऊ शकतात. (विशेषत रात्री ) त्यांची भेट टाळायची असेल तर त्या साठी आपण घेतलेली काळजी. साप हे झाडीत अडगडीत म्हणजे दमट, अंधाऱ्या ओलसर जागी राहणे पसंद करतात. हे लक्षात घेतल्यास सर्पदंश टाळण्यासाठी आपण खालील खबरदारी घेऊ शकतो.
🐍 रात्रीच्या वेळी जमिनीवर झोपणे टाळा !
🐍घराजवळ विटाचे तुकडे, काठी, पाला, पाचोळा ठेऊ नये उंदीर, बेडूक, घूस घरात येणार नाही हि काळजी घ्या !
🐍रात्रीचा वेळेला अंधारामध्ये टोर्च घेऊनच बाहेर निघा !
🐍शेतामध्ये पायात बुटचा वापर करा !
🐍घरातील सांडपाणी बाहेर जाण्यासाठी असलेल्या सर्व आउट लेटला पक्की जाळी बसवून घ्या !
🐍साप लपतील अशी ठीकांने नष्ट करावीत. भिंती कुंपण यांना तडा अथवा भोके पडली असल्यास व्यवस्थित बुजवून घ्यावीत !
🐍अडचणीत व अडगडीत हात घालताना आत काही नाही याची खात्री करूनच हात घालावे !
साप तुमच्या परिसरात आढळल्यास सापाला कुठलीही इजा न पोहचवता जवळील सर्पमित्रांना बोलवावे. सर्पमित्र येईल तोपर्यंत सापावर सुरक्षित अंतर ठेऊन नजर ठेवावी जेणेकरून सर्पमित्रांना सापाचा शोध लवकर घेता येईल.
चंद्रपूर शहरातील सर्पमित्र व त्यांचे संपर्क क्रमांक
साईनाथ चौधरी : - चंद्रपूर 8928139040
बंडू धोत्रे : - चंद्रपूर 9370320746
अमित देशमुख: - तुकुम 9075707275
कमलाकर वेव्हारे : - वडगाव 9850460177
सुमित महारतळे: - जटपुरा गेट 9359110673
आकाश नामेवार : - नगिनाबाग 9145245601
धनंजय सदार : - बिनबागेट 9623939800
विशाल रामेडवार : - पठाणपुरा 9325439980
अनिकेत चाहरे : - पठाणपुरा 9370244629
कुणाल महाले : - विठ्ठल मंदिर वॉर्ड 8446821831
निनाद डोंगरे : - विठ्ठल मंदिर वॉर्ड 8208486087
अमित पुट्टेवार : - गिरनार चोक 7972344898
आशिष तांबटकर : - तूकुम 9175377417
प्रशांत इंगुलकर - इंदिरा नगर 9372483980
विकील शेंडे : - भिवापूर वॉर्ड 8793266212
यश निखारे : - बाबुपेठ 7030355679
विक्की नेवलकर: - बाबुपेठ 9096543021
प्रलय कांबळे : - बाबुपेठ-लालपेठ 8806052119
हरीश वर्मा : - लालपेठ 8975173029
विक्की बेर्डे : - अष्टभुजा 7378982403
केशव कुळमेथे : - ऊर्जानगर 8329872451
अजय यादव : - शक्तीनगर 7722007414
वरील आपल्या जवळच्या परिसरात राहणाऱ्या सर्प मित्रांचे संपर्क क्रमांक आपल्या मोबाईलवर सेव करून ठेवावे.

