वरोरा - मागील 2 दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे, सततधार पावसाने नागरिकांचे जीवन अस्तव्यस्त झाले असून जनावरांचे ही या पावसात हाल होत आहे.
मात्र पावसापासून वाचण्यासाठी चक्क एका वाघाने गावातील गोठ्यात आडोसा घेत आपला बचाव केला.
वरोरा तालुक्यातील चारगाव येथे राहणारे संजय लाखे यांच्या गोठ्यात दुपारी 4 वाजताच्या सुमारास वाघ शिरल्याने एकच खळबळ उडाली होती. Wild animals
वाघाला बघताच नागरिकांनी आरडाओरडा केला मात्र वाघ गोठ्यात दडून बसला. गावातील शेत शिवरातून मार्ग काढत हा वाघ गोठ्यात आला असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. Tadoba tiger
मात्र नागरिकांच्या गर्दी मुळे वनविभागाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला, चारगाव जवळील अनेक गावातील नागरिकांनी वाघ दडलेल्या ठिकाणी आपला मोर्चा वळविला. Chandrapur tiger