News 34 chandrapur
चंद्रपूर - रामाला तलाव जवळ सुयश भुसारी यांचं जीर्ण अवस्थेत असलेले जुने घर होते, त्या जीर्ण घराला पाडत नवीन बांधकाम भुसारी यांनी सुरू केले होते. Extortionist
मात्र एकदिवस अचानक चंद्रपूर मनपा द्वारे घराचे काम बंद पाडण्यात आले, व बांधकाम संबंधी कागदपत्रे मनपात येऊन दाखविण्यासंदर्भात नोटीस दिले. Human Rights Research Association
भुसारी हे मनपात गेले असता लिपिकाने त्यांना सांगितले की शेखर निषाद या व्यक्तीने तुमच्याविरोधात तक्रार दिली आहे.
भुसारी यांनी निषाद यांची भेट घेतली असता ते म्हणाले की तुमचे बांधकाम अवैध स्वरूपाचे आहे, आम्ही मानवाधिकार संशोधन असोसिएशन संघटनेचे आहोत मी स्वतः असोसिएशनचा जिल्हा उपाध्यक्ष असून योगेश सादलावार आमचे अध्यक्ष आहे, जर बांधकाम पूर्ण करायचे असतील तर आम्हाला 5 लाख रुपये द्या, पैसे दिल्यावर लगेच तक्रार परत घेऊ.
भुसारी यांची पैसे देण्याची इच्छा नव्हती, मात्र मानवाधिकार असोसिएशनचे योगेश सादलावार, सचिन नरांजे व शेखर निषाद यांनी भुसारी कडे पैश्याचा तगादा लावला, पैसे द्या नाहीतर बांधकाम पाडत सील लावण्यात येणार अशी धमकी भुसारी यांना देण्यात आली. भुसारी यांनी यासंदर्भात शहर पोलीस स्टेशन गाठत तिघांच्या विरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी कलम 384, 385 व 34 अंतर्गत खंडणी चा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.