News 34 chandrapur
गुरू गुरनुले
मुल - जंगल संपत्ती ,वन्य प्राणी आणि मानव पशुहानी हेच आमचे दैवत समजून पर्यावरणाच्या रक्षणासाठी कर्तव्य करणे हीच प्रमुख जबाबदारी समजून चिचपल्ली वनपरिक्षेत्रात महिला वनपरिक्षेत्र अधिकारी कु. प्रियंका आर. वेलमे येऊन नियमीत जंगल गस्तीने चिचपल्ली वनपरिक्षेत्रात मानव वन्यजीव संघर्षाचे घटना व पशुहानीच्या अवैध वृक्षतोड, Wildlife hunting वन्यप्राणी शिकार, अवैध उत्खणन, अवैध अतिक्रमण होणार नाही अश्या घटनेवर नक्कीच आळा बसला असल्याचे दिसून येत आहे.
चीचपल्ली वनपरिक्षेत्रात माहे सप्टेंबर 2021 पासून नव्याने रुजू झालेल्या कु. प्रियंका रमेश वेलमे, वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली या पदावर कार्यरत झाल्यापासून विचपल्ली वनपरिक्षेत्रात दरवर्षी 5 ते 6 भागात वन्यजीव संघर्षाच्या घटना घडत होते. परंतु नव्याने रुजू झालेल्या महिला वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी व त्यांचे अधिनिस्त असलेले क्षेत्रीय कर्मचारी यांना हाताशी घेऊन योग्यरित्या समन्वय साधुन सदर चिचपल्ली परिक्षेत्रातील गावागावात वन्यजीव मानव संघर्षाबाबत जनजागृती करणे व क्षेत्रीय कर्मचाऱ्या सोबत राहून स्वतः वाघाच्या हालचाली बाबत संनियत्रण ठेवुन camera trap कॅमेरा ट्रॅप लावणे. क्षेत्रिय कर्मचाऱ्याचे नियमित गस्त करून वन्यप्राण्यांचे मागोवा घेणे. तसेच क्षेत्रिय कर्मचान्यांना रात्री रात्री जंगल गस्त करल असनांना क्षेत्रिय कर्मचारी यांचे सुरक्षेतिचे साहित्य पेठीय उपलब्ध करून दिले. तसेच चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र मुल नियतक्षेत्र मुल अंतर्गत मौजा कोसंबी येथील महिला शेतकरी सौ ज्ञानेश्वरी वासुदेव मोहुर्ले, रा. कोसंबी ही वाघाच्या हल्यात मृत पावली असता स्वतः जातीने उपस्थित राहून पुढाकार घेऊन वारसदाराना तातडीची रक्कम अदा करून उर्वरित रक्कम एक महिन्याचे आत मिळवून दिले.
तसेच रात्री आपले अधिनिस्त असलेले क्षेत्रिय कर्मचारी यांना सोबत घेवून रात्रीच्या वेळेस गस्त करित असतांना अवैधरित्या बांबू कटाई करुन तयार करण्यात आलेल्या ताटवे वाहतुक करित 3 से 4 वाहने जप्त करून त्यांचेवर कार्यवाही करून प्रतिबंध घातले.तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजने अंतर्गत रोपवाटीकेचे कामे प्रस्तावित करून चिचपल्ली परिक्षेत्रात 3.00 लक्ष रोपांचे उदिष्ट यशस्वीरित्या पूर्ण करून रोपांची वाढ अडीच ते तिन फुटाचे रोपे तयार करून शासणाने दिलेल्या रोपवन लागवडीचे कामे व उदिष्ट्ये पूर्ण करून रोपवन यशस्वीरित्या केले आहे.
Chandrapur forest
तसेच दरवर्षी वनविभागाचे मंजुर कार्यआयोजनेच्या कामांना उशिरा मंजुरी मिळाल्याने महिला वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली यांनी जातीने लक्ष देवुन बांबु कुपाचे कामे, तसेच कुप कटाईचे काम क्षेत्रीय कर्मचारी यांना योग्य सुचना व मार्गदर्शन करून वेळेतच कामे पूर्ण करून शासनाला जास्तीत जास्त महसुल प्राप्त करून दिला आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली या पदावर महिला अधिकारी असुन सुध्दा योग्य नियोजन आणि अधिकारी व कर्मचारी यांचेशी समन्वय ठेऊन धळाळीने जिदिने दिवस व रात्रो जंगल गस्त करून अवैध वृक्षतोड, अवैध वन्यप्राणी शिकार, अवैध उत्खनन, अवैध अतिक्रमण होणार नाही याबाबत योग्य ती नियमांनव्ये कार्यवाही करुन आणि शासनाने दिलेल्या उदिष्ट्ये पूर्ण करुन जास्तीत जात शासनाला महसुल प्राप्त करून देण्यात त्यांचा वाटा राहिला असल्याचे दिसून येत आहे.