News 34 chandrapur
चंद्रपूर - रामनगर पोलीस स्टेशन मधील स्थानिक गुन्हे शोध पथकाने महत्वाची कामगिरी बजावत 4 घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.म्हाडा कॉलनी दाताला येथे घरात प्रवेश करीत लोखंडी आलमारीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता, अश्या प्रकारे नेहरूनगर मध्ये सुद्धा घराचा दरवाजा उघडा असताना सोन्याचे दागिने व रोख असा एकूण 2 लाख 15 हजार रुपयांचा माल अज्ञाताने चोरून नेल्याची घटना घडली होती. Burglary
गुन्ह्याचे गांभीर्य बघता रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांनी गुन्हे शोध पथकाचे सपोनि हर्षल एकरे यांना गुन्ह्याचा छडा लावण्याचे निर्देश दिले.
सपोनि एकरे यांनी गुन्ह्यातील सर्व बाबी तपासून बघितल्या, सायबर सेल व गोपनीय माहिती गोळा करीत रेकॉर्डवरील आरोपी शामनगर येथील 24 वर्षीय अतुल विकास राणा याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हे केल्याची बाब कबूल केली. Chandrapur crime
राणा ला विश्वासात घेत अधिक माहिती जाणून घेतली असता त्याने रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत 1 घरफोडी व पोलीस स्टेशन मूल मध्ये घरफोडी केली असल्याची कबुली दिली.
घरफोडी केल्यावर त्यामधील रोख रकमेतून आरोपीने 1 लाख रुपयांची दुचाकी देखील घेतली, आरोपी राणा कडून 4 घरफोडी मधील 4 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सपोनि हर्षल एकरे, पोउपनी विनोद भुरले, रजनीकांत पुठ्ठावार, पेतरस सिडाम, किशोर वैरागडे, विनोद यादव, मरसकोल्हे, विकास जुमनाके, आनंद खरात, लालू यादव, भावना रामटेके, सायबर सेलचे मुजावर अली, प्रशांत लारोकर, छगन जांभुळे यांनी यशस्वीपणे पार पाडली.