चंद्रपूर - महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेला एकनाथ शिंदे यांनी मोठे खिंडार पाडत पक्षाचे 40 आमदार फोडले, सर्व आमदारांना सोबत घेत शिंदे यांनी भाजपशी युती करीत राज्याचे मुख्यमंत्री बनले.
मात्र त्यांनंतरही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे न डगमगता पक्ष पदाधिकार्या सोबत संवाद साधत शिवसेना पुन्हा उभी करू असे आश्वस्त केले. Uddhav thackeray birthday
27 जुलैला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस, मात्र कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत आपण सर्व पक्षासोबत एकनिष्ठ आहात याबाबत प्रतिज्ञापत्र माझ्याकडे सोपवा तेच माझ्या वाढदिवसाची मोठी भेट राहणार असे आवाहन केले.
27 जुलैला मातोश्री वर शिवसैनिकांनी एकच गर्दी करीत हजारोंच्या संख्येने पक्ष प्रमुखापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले. Shivsena matoshri
चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी मुंबई गाठत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत चंद्रपूर जिल्ह्यातून तब्बल 3 हजारांच्या वर एकनिष्ठतेची प्रतिज्ञापत्र सादर केली. Loyal shivsainik
व आम्ही सदैव शिवसेना पक्षाशी प्रामाणिक राहणार अशी शपथ सुद्धा घेतली.