News 34 chandrapur
गुरू गुरनुले
मुल - राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री काँग्रेसचे नेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार हे काँग्रेस पक्ष सोडून भाजपच्या वाटेवर असे आक्षेपार्ह लिखाण करीत त्यांची प्रतीमा मलीन करण्याच्या उद्देशाने बिनबुडाचे आरोप करीत लिखाण करून चंद्रपूर येथील विचारपीठ वेब पोर्टलचे स्वयंघोषित लेखक गौतम गेडाम यांनी बदनामी केली आहे. Offensive writing
त्यामुळे काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व समस्त कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या, नाहक गैरसमज निर्माण झाले. म्हणून मूल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम येनुरकर यांनी गौतम गेडाम यांच्या विरुद्ध मूल पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या विरुद्ध त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली.
मूल पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करतांना काँग्रेस पक्षाचे मुल तालुका अध्यक्ष घनश्यामभाऊ येनुरकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, काँग्रेस शहर अध्यक्ष सुनिल शेरकी, ज्येष्ठ पदाधिकारी बंडूभाऊ गुरणूले, शहर उपाध्यक्ष कैलाश चलाख, सुरेश फुलझेले, संदिप मोहबे, माजी नगरसेवक विनोद कामडे, अन्वर शेख,अभिजीत चेपुरवार, संचालक विवेक मुत्यलवार, रंजीत आकुलवार, विष्णू सादमवार. आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.