News 34 chandrapur
चंद्रपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपूरातील प्रसिध्द डॉक्टर सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार यांचे शुक्रवार(3 जुन2022) ला सायं 7.14 वाजता निधन झाले.नागपूर येथील किंग्जवे या रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या पार्थिवावर चंद्रपुर येथील शांतिधाम (मोक्षधाम)वर शनिवारी सायं 6 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.जेष्ठपुत्र आ.सुधीर मुनगंटीवार यांनी मुखाग्नी दिला आणि डॉ.सच्चिदानंद मुनगंटीवार अनंतात विलीन झाले.रविवारी 5 जूनला सकाळी 9 वाजता अस्थी विसर्जन केले जाणार आहे.
Rss
डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार हे मृत्युसमयी91 वर्षाचे होते.वृध्दपकाळाने त्यांचे निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक, लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष, चिन्मय मिशनचे अध्यक्ष, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे अध्यक्ष अशा विविध जबाबदा-या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या. त्यांनी भारतीय जनसंघातर्फे चंद्रपूर विधानसभेची निवडाणूक देखील लढली होती. विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार हे त्यांचे ज्येष्ठपुत्र तर चंद्रपूरातील प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. संदीप मुनगंटीवार हे त्यांचे कनिष्ठपुत्र होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी सुचिता चकनलवार, स्नुषा, जावई, नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे.शनिवारी सायं. 4.30वा.त्यांच्या कस्तुरबा चौक निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघाली तेव्हा अलोट जनसागर अंतिम दर्शनासाठी उसळला. शांतीधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा सरसंघचालक ऍड रवींद्र भागवत यांच्या अध्यक्षतेत शोकसभा घेण्यात आली.संचालन डॉ प्रशांत आरवे यांनी केले.यावेळी माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर,माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे,आ.किशोर जोरगेवार,भाजपा संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर,काँग्रेस नेते रामू तिवारी, भाजपा नेते डॉ मंगेश गुलवाडे,राजेंद्र गांधी, प्रमोद कडू,देवराव भोंगळे,ब्रिजभूषण पाझारे,सुभाष कासंगोट्टूवार, राहुल पावडे, यांचेसह हजारो प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.
आजी माजी पालकमंत्र्यांनी केले सांत्वन
शनिवारला सकाळपासूनच स्व.डॉ सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी खुले करण्यात आले.पालकमंत्री विजय वडेट्टीवार,माजी पालकमंत्री शोभा फडणवीस,खा.अशोक नेते,चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ,गुरुदेव सेवा मंडळ,चे पदाधिकारी व सदस्यांनी आदरांजली अर्पण करून समस्त मुनगंटीवार परिवाराचे सांत्वन केले.
