News 34 chandrapur
चंद्रपूर - 3 जून ला बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस अंमलदार मोनल मेश्राम ह्या कर्तव्य पूर्ण करीत राजुरा येथील आपल्या घरी परत जात असताना त्यांच्या दुचाकी वाहनाला मागून आयशर वाहनाने जोरदार धडक दिली.धडक बसताच मोनल यांचा वाहनावरून ताबा सुटला व त्या खाली कोसळल्या मोनल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मोनल यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला आहे. ladies bike helmet
याचं उत्तर पोलीस प्रशासनाच्या या कृतीमधून दिसत आहे, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी हेल्मेट बाबत 18 जानेवारी पासून सक्ती केली, राज्य महामार्गावर ही हेल्मेटसक्ती सक्ती लागू केली. Full face bike helmet
विशेष म्हणजे या हेल्मेटसक्ती मध्ये आधी शासकीय कर्मचारी यांना हेल्मेटसक्ती करण्यात आली होती.
मात्र ज्यावेळी मोनल यांचा मृत्यू झाला त्यांनी तेव्हा हेल्मेट परिधान केले नव्हते, त्यामुळे डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. Best road bike helmet
वाहतूक विभागाचे आदेश शासकीय कर्मचारी यांनी मनावर घेतले होते काय? आज पोलीस खरंच हेल्मेट परिधान करतात काय? शासकीय कर्मचारी पोलीस विभागाच्या आदेशाला गंभीर घेत आहेत काय?
रस्त्यावरील अपघातात मृत्यू हेल्मेट नसल्याने झाला असून आतातरी नागरिक असो की शासकीय कर्मचारी यांनी मनावर घ्यायला हवं. मोनल ने जर घरी जाण्यापूर्वी हेल्मेट परिधान केले असते तर आज ती ह्यात असती. Chandrapur police
मोनल सारख्या महिला पोलीस कर्मचारी यांचा मृत्यू हेल्मेट परिधान न केल्यामुळे झाला, कमीतकमी महामार्गावर विना हेल्मेट जाऊ नका.
