News 34 chandrapur
चंद्रपूर - वर्ष 2012 पासून राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूचा भेसळ बाजार सध्या चंद्रपुरात चर्चेचा विषय बनला आहे.
मालाची डिलिव्हरी होत नसल्याने आता सुगंधित तंबाखूची भेसळ करीत इथेच बनावट माल तयार करीत विकल्या जात आहे. Tobacco adulteration
नुकतेच चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने सुगंधित तंबाखूची भेसळ करणाऱ्या कारखान्यावर धाड मारीत 25 लाखांच्या मुद्देमालासहित 8 आरोपींना अटक केली. pan masala
2 वर्षांपूर्वी चीचपल्ली येथे पोलिसांनी एका फार्म हाऊसवर असाच कारखाना पकडला होता.
मात्र पुन्हा 2 वर्षांनी चंद्रपुरातील चित्र तसेच आहे.
आज विविध ठिकाणी बनावट सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहे, मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस चंद्रपुरातील पोलीस दाखवतील की नाही? असा प्रश्न सध्या जनमानसात उदभवला आहे. Vimal pan masala
रामदूत हनुमानाने संजीवनी बुटीचा पहाड उचलत, लक्ष्मण ला जीवदान दिले होते.
मात्र चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथे एक हनुमान सध्या चर्चेत आहे. Rmd pan masala
हा हनुमान संजीवनी बुटी तर आणत नाही परंतु लोकांसाठी सुगंधित तंबाखू आणून त्यांना कॅन्सर देण्याचं काम मात्र करीत आहे. Vimal gutkha
या हनुमान कडे बाबूपेठ चा पूर्ण एरिया आहे, ज्यामध्ये लहान मोठे तंबाखू, सुपारी व पान मसाला विक्रेत्यांना सुगंधित तंबाखू पुरवठ्याच काम करीत आहे. Rmd gutkha
30 ऑगस्ट 2021 ला हनुमान वर अन्न व औषध विभागाने कारवाई केली होती. मात्र त्यानंतर ही अवैध पणे या हनुमान ने सुगंधित तंबाखूचा पुरवठा नियमितपणे केला. Gutkha
2021 नंतर हनुमान वर कारवाई झाली नाही, कारण या हनुमान ने बाबूपेठ व शहरी भागात तब्बल 7 ते 8 घर घेतली आहे, आणि ते नेमकं कुठं आहे याचा थांगपत्ता अजूनही लागत नसल्याने प्रशासनाला कारवाई करण्यास अडचणी येत आहे. Fragrant tobacco mafia
हनुमान तर्फे कॅन्सर पेरण्याचं काम अनेक वर्षांपासून सुरू आहे, हनुमान यांचं थेट कनेक्शन वसीम सोबत आहे, वसीम मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू व पान मसाल्याची वाहतूक करीत माल सप्लाय करीत आहे.
आता तर ईगल व मजा हे चंद्रपूर शहरातचं भेसळ करण्यात येत आहे.
2 कारखाने आधीच पकडले आहे पण अजूनही 2 ते 3 कारखाने चंद्रपूर व बल्लारपूर शहरात सुरू आहे.
त्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूची भेसळ करीत बाजारात विकल्या जात आहे, यामुळे युवक व नागरिकांना कॅन्सर सारखा जीवघेणा आजार मोफत मिळत आहे. Tobacco free chandrapur
प्रशासनाने सुगंधित तंबाखू व पानमसाला माफियांवर तात्काळ कारवाई करीत चंद्रपूर जिल्ह्याला तंबाखू व पानमसाला मुक्त जिल्हा बनवावा.
