News 34 chandrapur
चंद्रपूर : शहरातील बंगाली कॅम्प हा महत्वाचा चौक आहे. या चौकातून मूल, बल्लारपूरकडे जाणारी वाहने जात असतात. दिवस-रात्र येथून वाहनांची वर्दळ असते. परंतु, दररोज सकाळी इमारत बांधकाम मजूर या चौकात कामाच्या शोधात येथे एकत्र येत असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होवून अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या कामगारांसाठी स्वतंत्र जागा देण्याची मागणी शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख मनोज पाल यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना सादर केले आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना सादर केले आहे.
इमारत बांधकाम मजूर दररोज सकाळी ६ ते १०.३० वाजेपर्यंत येथे एकत्र होतात. A busy place
त्यानंतर बांधकाम ठेकेदार या मजुरांशी बोलणी करून ठरलेल्या कामावर नेत असतात. या कालावधीत येथे मोठी गर्दी होत असते. Building construction labor
त्यामुळे वाहतुकीची कोंडी होवून अपघाताच्या किरकोळ घटना घडल्या आहेत. या कामगारांना स्वतंत्र जागा उपलब्ध करून न दिल्यास भविष्यात अपघाताची मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. Bengali camp
सोबतच परिसरातील रहिवासी भागातील नागरिकांना या मजुरांच्या गोंगाटाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी भाजी बाजाराजवळ महसूल विभागाची खुली जागा या कामगारांना एकत्र येण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी पाल यांनी निवेदनातून केली आहे.